26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआंदोलक कुस्तीगीर आणि धावपटू पीटी उषा यांच्यात संघर्ष

आंदोलक कुस्तीगीर आणि धावपटू पीटी उषा यांच्यात संघर्ष

भारतीय कुस्तीगीरांच्या आंदोलनावर उषा यांनी केली होती टीका

Google News Follow

Related

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करून त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंनी आता सुप्रसिद्ध ऍथलिट आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रमुख पीटी उषा यांनाही लक्ष्य केले आहे. भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाला बेशिस्त म्हणत टीका केल्याने उषा यांना आता त्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. त्याचवेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी उषा या महिला असूनही महिलांचे दु:ख समजू शकत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

बृजभूषण शरण यांच्यावर महिला मल्लांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात सर्व भारतीय मल्लांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर धरणे धरले होते. तीन महिन्यांच्या स्थगितीनंतर भारतीय मल्ल २३ एप्रिलपासून पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. तसेच, दिल्ली पोलिस सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यास नकार देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मात्र न्याय मिळेपर्यंत आमचा विरोध कायम राहील, यावर पुनिया ठाम आहेत. ‘मला जेव्हा पीटी उषा यांच्या टिप्पणीबाबत कळले तेव्हा खूप दु:ख झाले. कारण आम्ही त्यांना चांगले ऍथलीट मानतो. त्या महिला असूनही त्या महिलांचे दु:ख समजून घेत नाहीयेत. गेले तीन महिने आम्ही न्यायाची प्रतीक्षा करत आहोत आणि याला ते बेशिस्त व्यवहार म्हणत आहेत,’ असे पुनिया यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

सरकारी बंगला बांधण्यासाठी चक्क ऐतिहासिक वास्तू केली जमीनदोस्त

बसमध्ये इयरफोनशिवाय व्हीडिओ, ऑडिओ ऐकलात तर कान पकडणार!

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

काय म्हणाल्या होत्या पीटी उषा?

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी कुस्तीपटूंनी आंदोलन पुन्हा सुरू करण्याआधी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडे (आयओए) आले पाहिजे होते, असे मत मांडले होते. ‘लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींसाठी आयओएमध्ये समिती आणि ऍथलीट आयोग आहे. रस्त्यावर उतरण्याआधी त्यांनी आमच्याकडे आले पाहिजे होते. परंतु ते आले नाहीत,’ अशी टीका त्यांनी केली होती. ‘ते धरणे आंदोलन करत आहेत आणि सर्व राजकीय पक्षांना यात सहभागी होण्यास सांगत आहेत. हा प्रकार अतिशय खेदजनक आहे,’ असेही त्या म्हणाल्या. याआधीही आयओएने ऍथलीटनी आंदोलन करण्याऐवजी आयोगाकडे यावे, असे आवाहन केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा