आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव

थायलंडचा ७- २ असा पराभव

आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव

भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषकावर भारताचे नाव कोरले आहे. २९ ऑगस्ट रोजी थायलंडचा ७- २ असा पराभव करून महिला हॉकी आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या विजेतेपदासह भारतीय महिलांचा संघ एलिट गटात प्रथम स्थान मिळवून महिला हॉकी विश्वचषक ओमान- २०२४ साठी पात्र ठरला आहे.

भारताकडून मारियाना कुजूर (२’, ८’), मोनिका दीपी टोप्पो (७’), ज्योती (१०’, २७’), नवज्योत कौर (२३’) आणि महिमा चौधरी (२९’) यांनी गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. तर, थायलंडच्या संघाकडून कुंजिरा इनापा (५’) आणि सॅनपोंग कोर्नकानोक (५’) यांनी गोल केले. भारताने सामन्याच्या पहिल्या हाफच्या सुरुवातीच्या मिनिटांत आक्रमक सुरुवात केली. मारियाना कुजूरने पहिला गोल करत भारताचे खाते उघडून चांगली आघाडी मिळवून दिली.

मात्र, थायलंडने कुंजिरा इनापा (५) आणि सॅनपॉग कोर्नकानोक (५) यांच्या माध्यमातून सलग दोन गोल करत भारताला बॅकफूटवर आणले. मात्र, खेळावर लगेच पकड घेत संघातील मोनिका दीपी टोप्पो हिने त्वरित प्रत्युत्तर देत गोल केला. तर पुढे मारियाना कुजूर आणि ज्योती यांच्या शानदार खेळामुळे भारताने पहिल्या हाफ अखेर ४-२ अशी आघाडी घेतली.

हे ही वाचा:

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

‘इंडिया’ गटाला धक्का? ‘आप’ बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’

खेळाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीला भारतीय संघाने खेळावर पकड ठेवत थायलंड संघाच्या बचावाला आव्हान देणे सुरूच ठेवले. अखेर कर्णधार नवज्योत कौर हिने गोल करून भारताला ५-२ अशी आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटे बाकी असताना ज्योतीने आणखी एक गोल करून ६-२ अशी आघाडी घेतली तर त्यानंतर महिमा चौधरीने २९ व्या मिनिटाला गोल करून ७-२ अशी आघाडी घेतली आणि तीच निर्णायक ठरली.

Exit mobile version