प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कामगिरी करत भारतीय महिला हॉकी संघाने हॉकी विश्वचषकात स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय महिला संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेतील सामन्यात विजय मिळवून विश्वचषक हॉकी स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला.
विश्वचषक हॉकी स्पर्धा हे १ ते १७ जुलैदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी हॉलंड आणि स्पेन हे संयुक्तपणे यजमानपद भूषवणार आहेत. भारतीय महिला संघाने मंगळवारी २५ जानेवारी रोजी आशिया कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंगापूरचा पराभव केला.
हे ही वाचा:
प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा
उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह
‘किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकाराने नोटीस पाठवली आहे?’
राज्यातील महाविद्यालये या तारखेपासून होणार सुरू
भारताने ९-१ अशा मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. संघाच्या विजयात गुरजित कौर (८, ३७, ४८ वा मि.), मोनिका (९, १७ वा मि.), ज्योती (४५, ५८ वा मि.), वंदना कटारिया (८ वा मि.) आणि मारियाना कुजुरी (१० वा मि.) यांनी गोल करत भारतीय संघाचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून भारतीय संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
भारतासमोर आता बुधवारी तीन वेळच्या आशिया कप विजेत्या कोरिया संघाचे आव्हान आहे. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात हे दोन्ही संघ समोरासमोर असणार आहेत.