आशियाई क्रीडा स्पर्धा सध्या रंगात आली असून या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे दिवसातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. भारतीय महिला संघाने १९ धावांनी श्रीलंकेच्या महिला संघाचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयाला फारशी साजेशी कामगिरी केली नाही. निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात केवळ ११६ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानदार खेळी केली.
Gold for India 🥇
Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥
📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu
— ICC (@ICC) September 25, 2023
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वेगवान सुरुवात केली होती. पण नऊ धावा करून शेफाली वर्मा तंबूत परतली. त्यानंतर स्मृतीने जेमिमासोबत भारताचा डाव सावरला. या दोघींनी ८० धावांची भागिदारी केली. मात्र, पुढे ठराविक अंतराने या दोघी बाद झाल्यावर भारताची फलंदाजी ढेपाळली. स्मृती मंधाना हिने ४५ चेंडूमध्ये चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४६ धावांची खेळी केली. तर जेमिमाने ४० चेंडूत पाच चौकारांसह ४२ धावांचे योगदान दिले. पुढे रिचा घोष हिने ९ धावा, कर्णधार हरमनप्रीत कौर हिने २ धावा, पूजा २ धावा आणि अमनज्योत कौर हिने १ धाव केली. यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
हे ही वाचा:
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल
चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!
भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई
श्रीलंकेची गोलंदाज प्रबोधिनी, एस. कुमारी आणि आय. रानवीरा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडले. भारताकडून तितास साधू हिने भेदक मारा करत श्रीलंकेच्या धाव फलकावर अंकुश ठेवला. तिने चार षटकार अवघ्या सहा धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडले. साधू हिने एक षटक निर्धावही फेकले. राजेश्वरी गायकवाड हिने २ विकेट्स घेतल्या. तर, दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैदय यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
आशियाई स्पर्धेतील मेडल्स तक्ता
चीन – ५० पदके
रिपब्लिक ऑफ कोरिया – २२ पदके
उझबेकिस्तान – ११ पदके
जपान – २३ पदके
भारत – ११ पदके