भारतीय महिला संघ खेळणार पहिली पिंक बॉल टेस्ट

भारतीय महिला संघ खेळणार पहिली पिंक बॉल टेस्ट

पुरुषांच्या सोबतच महिला क्रिकेटमध्येही भारतीय संघ आपला ठसा उमटवत आहे भारताचा महिला क्रिकेट संघाची क्रिकेटमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी करत आहे यातच आता ता भारतीय महिला क्रिकेट संघ आपली पहिली पिंक बॉल टेस्ट अर्थात डे नाईट कसोटी खेळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.

जगभर सध्या कोविडचा हाहाकार सुरू असताना त्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसत आहे. क्रीडाक्षेत्रही याला अपवाद नाही. एकीकडे कोविडमुळे अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द होताना दिसत आहेत किंवा पुढे ढकलल्या जात आहेत. पण अशातही त्यांच्या दृष्टीने काही सकारात्मक बातम्या येत आहेत. गुरुवार २० मे रोजी अशीच एक सकारात्मक बातमी क्रिकेटच्या दृष्टीने आणि त्यातही विशेष करून महिला क्रिकेटच्या दृष्टीने पुढे आली. महिला क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक खुशखबर आली आहे. ती म्हणजे भारतीय महिला संघ लवकरच आपला पहिला पिंक बॉल कसोटी सामना खेळणार आहे ऑस्ट्रेलिया सोबत होणार्‍या त्यांच्या मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदा डे नाईट स्वरूपाचा पिंक बॉल कसोटी सामना खेळतील.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे घराबाहेर पडले तर ती ब्रेकिंग न्यूज असेल

रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

लसीचा एक डोसही वाया घालवू नका, मोदींनी दिला कानमंत्र

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटप्रती आमची कटिबद्धता पुढे घेऊन जाताना मला हे जाहीर करायला खूप आनंद होतोय की यावर्षी ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या मालिकेत भारतीय महिला संघ आपला पहिला वहिला पिंक बॉल कसोटी सामना खेळणार आहे.

Exit mobile version