भारतीय महिला क्रिकेट संघ आज आपला ऐतिहासिक सामना खेळत आहे. भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका आज पासून म्हणजेच गुरुवार ३० सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. या कसोटी मालिकेतील पहिलाच सामना भारतीय महिला क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा पहिलाच पिंक बॉल कसोटी सामना आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यापूर्वी २००६ साली एकमेकांसोबत शेवटचा कसोटी खेळले होते. त्या संघात सध्यच्या संघातील फक्त २ खेळाडू होत्या. त्या म्हणजे मिथाली राज आणि झूलन गोस्वामी. या दोघीं व्यतिरकीत बाकी सर्व खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघासोबत कसोटी सामना खेळत आहेत.
हे ही वाचा:
लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!
मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….
बँकेतून होणारे ऑटो डेबिट बंद! वाचा काय आहेत नवीन नियम
पोकळ आश्वासनं नको…शेतकऱ्याला तातडीची मदत द्या
भारतीय महिला संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. सध्याच्या घडीला भारताची स्थिती मजबूत आहे. पावसाने सध्या या सामन्यात व्यत्यय आणला आहे. भारतीय संघाने एकूण ११४ धावा केल्या आहेत. स्मृती मानधन ही ७० धावांवर नाबाद खेळत आहे. तिला पूनम राऊत साथ देत आहे. तर सलामीवीर शेफाली वर्मा ही ३१ धावांवर बाद झाली आहे.
क्विन्सलँड येथे हा सामना खेळला जात आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी दहा वाजता हा सामना सुरु झाला आहे. सोनी सिक्स, सोनी वन, सोनी टेन, या वाहिन्यांवर क्रिकेट रसिकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणे शक्य होणार आहे.