हमासच्या रॉकेटमुळे भारतीय महिलेचा इस्राएलमध्ये मृत्यू

हमासच्या रॉकेटमुळे भारतीय महिलेचा इस्राएलमध्ये मृत्यू

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सोमवारी पुन्हा संघर्षाला तोंड फुटले होते. सोमवारी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हमासनं इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्यामध्ये भारतातील  सौम्या संतोष या महिलेला जीव गमवावा लागला आहे. हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र सौम्या संतोष ज्या घरात होती त्यावर घरावर कोसळलं यामध्ये तिचा मृत्यू झाला. सौम्या संतोष ही केरळमधी इडुक्की मधील होती. इस्त्राईलमध्ये गेल्या सात वर्षांपासून केअर टेकर म्हणून ती काम करत होती.

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष सोमवारी पहाटे सुरु झाला. हे सुरु असतानाच सौम्या संतोष तिच्या पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती. सौम्याच्या घरावर क्षेपणास्त्र पडलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सौम्या संतोषच्या नातेवाईक शर्लिन बेबी यांनी ही घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार ३ वाजता घडली. त्या ज्यावेळी सौम्याच्या घराजवळ पोहोचल्या तेव्हा सर्व नष्ट झालं होतं, असं म्हणाल्या. सौम्या आणि एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

सौम्या संतोष गेल्या ७ वर्षांपासून इस्त्राईलमध्ये केअर टेकर म्हणून काम करत होत्या. २०१७ मध्ये त्या त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आल्या होत्या. सौम्या संतोष हिच्या पतीचा भाऊ साजी यांनी ही माहिती दिली. सौम्या संतोष हिचे पती संतोष हे शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा देखील आहे. सौम्या संतोष हिचं पार्थिव भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे, असं साजी यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

जळगाव महापालिकेत राडा

ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

भारताचे परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी ट्विट करुन सौम्या संतोष हिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुरलीधरन यांनी सौम्या संतोष हिच्या परिवाराचं सांत्वन केल्याची माहिती दिली. पीडित कुटुंबाची मदत करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

Exit mobile version