28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषवेस्ट इंडिजच्या त्या दौऱ्यात जेव्हा संपूर्ण भारतीय संघ जखमी झाला होता…

वेस्ट इंडिजच्या त्या दौऱ्यात जेव्हा संपूर्ण भारतीय संघ जखमी झाला होता…

१९७६च्या मालिकेचा अनुभव अत्यंत भयंकर होता

Google News Follow

Related

आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप्सच्या अंतिम सामन्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर निघेल. हा दौरा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुर होईल. भारतीय संघ सन १९५३ पासून वेस्ट इंडिजचा दौरा करत आला आहे. मात्र १९७६च्या मालिकेचा अनुभव अत्यंत भयंकर होता. आगामी दौऱ्याच्या निमित्ताने भारताचा वेस्ट इंडिजमधील इतिहास पाहणे रंजक ठरेल.

भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी-२० सामने खेळेल. कसोटी सामन्याची सुरुवात १२ जुलैपासून होईल. त्यानंतर एकदिवसीय सामने आणि नंतर टी-२० सामने खेळवले जातील. भारतीय संघ पहिल्यांदा सन १९५३ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे त्याला ०-१ ने पराभव पत्करावा लागला होता. तर, १९७६च्या दौरा अतिशय भयावह अनुभव देणारा ठरला होता. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ४०३च्या लक्ष्याचा पाठलाग करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. चौथ्या डावात सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा हा विक्रम २७ वर्षे अबाधित राहिला होता. मात्र त्यानंतर २१ ते २५ एप्रिल १९७६ दरम्यान किंग्स्टन येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला भयंकर अनुभवाला सामोरे जावे लागले.

 

वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यामुळे भारताचा संघ जखमी झाला होता. त्यातील पाच खेळाडू तर इतके जखमी झाले की ते दुसऱ्या डावातील खेळासाठी मैदानावरही उतरू शकले नाहीत. स्कोअर बोर्डवर त्यांच्या नावापुढे ‘ऍबसेंट हर्ट’ असे लिहिण्यात आले होते. म्हणजे पाचही खेळाडू न खेळताच बाद मानण्यात आले. भारताने मालिकेत १-१ने बरोबरी साधली होती. मात्र किंग्स्टनच्या सबिना पार्कमध्ये वेगवान गोलदांजांनी भारतीय संघाला लक्ष्य केले. मायकल होल्डिंग, वॅन डॅनियल, बर्नार्ड जूलियन आणि वॅन होल्डर यांच्या वेगवान आक्रमणाचा सामना करत भारताला सहा बाद ३०६ धावांवरच खेळ घोषित करावा लागला.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी अमृतपालचा हस्तक खांडा लंडनमध्ये मृत

संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी दिली

तरुणीवर लोकलमध्ये जबरदस्ती करणाऱ्याला मस्जिद बंदर स्टेशन परिसरातून पकडले

भारत इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळणार

तीन खेळाडू गंभीर जखमी

या वेळी अंशुमन गायकवाड (८१) आणि बृजेश पटेल गंभीर जखमी होऊन माघारी परतले. गायकवाड यांच्या डाव्या कानाला जखम झाली आणि त्यांना रुग्णालयात रात्रभर उपचार घ्यावे लागले. तर, बृजेश पटेल यांच्या तोंडाला जखम झाल्याने त्यांना टाके घालण्याची वेळ आली. तर, गुंडप्पा विश्वनाथ यांचे बोटच तुटले. ते पुढील तीन सामन्यांत खेळू शकले नाहीत. ३०६ धावांवर एस. वेंकटराघवन बाद झाल्यानंतर कर्णधार बिशनसिंह बेदी यांनी पहिला डाव घोषित केला. तेव्हा खरेतर बेदी मैदानावर उतरणार होते, त्यानंतर भागवत चंद्रशेखर यांचा नंबर होता. मात्र दोघांनीही वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यापासून स्वत:ला वाचवले.

भारतीय गोलंदाज निष्प्रभ

ज्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजच्या संघाने चांगली कामगिरी केली, त्यावर भारतीय गोलंदाजांना मात्र फारशी चमक दाखवता आली नाही. वेस्ट इंडिजने पहिल्या डावातच ३९१ धावा केल्या. संघाचे विश्वासू गोलंदाज मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ अनुक्रमे सात आणि आठच षटके टाकू शकले. दुसरीकडे बेदी, चंद्रशेखर आणि राघवन या फिरकीपटूंनी टिचून मारा केला.

९७/५वर भारतीय संघ आटोपला

भारतीय संघ दुसऱ्या डावात तीन फलंदाजांशिवाय उतरला. संघाने कशाबशा ९७ धावा केल्या. १२ धावा अधिक झाल्यानंतर भारताचा डाव संपुष्टात आला. बेदी आणि चंद्रशेखर क्षेत्ररक्षण करत असताना जखमी झाले. त्यामुळे ते फलंदाजी करण्यासही असमर्थ ठरले. त्यामुळे आधीचे अंशुमन गायकवाड, बृजेश पटेल, गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासह बेदी आणि चंद्रशेखर हेदेखील फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकले नाहीत आणि ते सर्व ‘ऍबसेंट हर्ट’ म्हणून घोषित केले गेले.
सर्व १७ खेळाडू मैदानावर जखमी झाल्यामुळे भारतीय संघाची अवस्था इतकी बिकट होती की, भारतीय संघाच्या सर्वच्या सर्व १७ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. या वेळी राखीव खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या सुरिंदर अमरनाथ यांना सामन्यादरम्यानच ऍपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात न्यावे लागले.

 

वेस्ट इंडिजने हा सामना १० गडी राखून जिंकून ही मालिका २-१ने खिशात टाकली. क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्वाखाली क्रिकेटच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजची ही कुठे सुरुवात होती. त्यानंतर १९८०पर्यंत वेस्ट इंडिजने क्रिकेटच्या विश्वात आपले वर्चस्व निर्माण केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा