किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे परदेशी आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांनी घरातच राहावे, अशी सूचना भारत सरकारने शनिवारी केली. या देशात सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुतेक विद्यार्थी येथे वैद्यकीय शिक्षणासाठी आले आहेत.
बिश्केक येथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर आपण लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. ‘तेथील परिस्थिती आता शांत असल्याचे समजते. भारतीय विद्यार्थ्यांनी तेथील दूतावासाच्या संपर्कात राहावे,’ असा सल्ला परराष्ट्र मंत्र्यांनी ‘एक्स’वर दिला आहे. इजिप्शियन आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या संघर्षात कोणताही भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र स्थानिकांनी त्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या दक्षिण आशियाई विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
बिश्केक येथील परिस्थिती शांत असून संपूर्ण नियंत्रणात आहे. तसेच, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी व शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे किर्गिझच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे, ब्लॉग कम्युनिटी आणि परदेशी सहकाऱ्यांनी केवळ सरकारी आणि किर्गिझ सरकारच्या अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिश्केक येथे स्थानिक आणि परदेशी लोकांमध्ये हिंसक संघर्ष उसळताच मोठ्या संख्येने जमाव जमला होता. तेव्हा परिस्थिती शांत करण्यासाठी ठीकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले. किर्गिझस्तानमध्ये स्थलांतरित विशेषतः
हेही वाचा :
बुटांच्या व्यापाऱ्यांच्या घरात सापडले ४० कोटी!
पाकिस्तानात मुलींच्या शाळांवर हल्ले!
पंतप्रधान मोदींच्या रॅलीत पोहोचले सिंगापूरचे उच्चायुक्त, रॅलीचे फोटो टाकत केले कौतुक!
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!
दक्षिण आशियाई लोकांशी वाद झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
विशेषत: इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या प्रदेशात किर्गिझ रिपब्लिकमधील परिस्थितीबद्दल जाणूनबुजून चुकीची आणि तथ्यहीन माहिती परदेशी प्रसारमाध्यमे आणि सोशल नेटवर्क्समध्ये प्रसारित केली जात असल्याचे किर्गिझ परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.