34 C
Mumbai
Saturday, May 3, 2025
घरविशेषभारतीय विद्यार्थिनीला कारने चिरडले

भारतीय विद्यार्थिनीला कारने चिरडले

Google News Follow

Related

भारतीय विद्यार्थिनी वांगवोलु दीप्तीचा टेक्सासच्या डेंटन शहरात ‘हिट- अँड- रन’ घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. दीप्तीच्या मास्टर्स डिग्रीचे केवळ काही आठवड्यांतच पूर्ण होणार होते. २३ वर्षीय दीप्ती ही आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी होती. २०२३ मध्ये गुंटूरच्या नरसारावपेट इंजिनीयरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर ती अमेरिकेत गेली होती. ती नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सिटीत संगणक व माहिती तंत्रज्ञान या शाखेत एमएस करत होती.

ही दुर्घटना १२ एप्रिलच्या सकाळी घडली, जेव्हा दीप्ती आणि तिची मैत्रीण स्निग्धा रस्त्यावर चालत होत्या. एक भरधाव सेडान कार त्यांना चिरडून पसार झाली. अपघातात दीप्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर स्निग्धाही जखमी झाली.

हेही वाचा..

पश्चिम बंगालममध्ये राष्ट्रपती शासन लागू करा

कर्नाटक: विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसांगकर यांची आत्महत्या

बीएचयूच्या हिंदी विभागावर एबीव्हीपीचा काय आरोप?

स्निग्धा ही देखील आंध्र प्रदेशच्या मेडिकोंडुरु येथील आहे. आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दोघींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे दीप्तीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार दीप्तीच्या उपचारासाठी क्राउडफंडिंग मोहिमेद्वारे जवळपास ८०,००० डॉलर्स (सुमारे ६६ लाख रुपये) जमा करण्यात आले. मात्र, तिचा जीव वाचवता आला नाही. १५ एप्रिल रोजी दीप्तीने अखेरचा श्वास घेतला. स्निग्धावर अजूनही उपचार सुरू आहेत.

डेंटन पोलिस विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. ही बातमी समजताच दीप्तीचे कुटुंब अक्षरशः कोसळले. त्यांनी १० एप्रिल रोजी तिच्यासोबत झालेली शेवटची फोनवरची बातचीत आठवली. दीप्तीने आपल्या आई-वडिलांना मे महिन्यात होणाऱ्या पदवीप्रदान समारंभासाठी निमंत्रण दिले होते. दीप्तीचे वडील हनुमंत राव हे छोटे व्यावसायिक आहेत आणि आई रमादेवी या गृहिणी आहेत. त्यांनी मुलीच्या परदेशातील शिक्षणासाठी आपली शेतजमीन विकली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा