ऑस्ट्रेलियामध्ये एका विद्यार्थ्यावर खलिस्तान समर्थकांनी अचानकपणे हल्ला करत मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. तोंडावर रॉड मारत बेदम मारहाण केली. पीडिताच्या चेहऱ्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत. हल्ला करणारा जमाव सतत ‘खलिस्तान जिंदाबादचा’ नारा देत होता, असा पीडिताचा आरोप आहे. या घटनेवरून खलिस्तान समर्थकांनी परदेशात भारतीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, पीडित विद्यार्थ्यावर वेस्टमीड, पश्चिम सिडनी या ठिकाणी हल्ला करण्यात आला.कामावर जात असताना माझावर हल्ला केला असे पीडित मुलाने सांगितले.तो पुढे म्हणाला,आज सकाळी ५.३० वाजता मी कामावर जात असताना, काही ४-५ खलिस्तान समर्थकांनी माझ्यावर हल्ला केला.मी माझ्या ड्रायव्हिंग सीटवर बसताच हे खलिस्तान समर्थक अचानक समोर आले. त्यापैकी एकाने माझ्या वाहनाचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि माझ्या डाव्या डोळ्याखाली माझ्या गालाच्या हाडावर लोखंडी रॉड मारला,” तो म्हणाला.
ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, नंतर त्याला वाहनातून बाहेर ओढले गेले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. दोन हल्लेखोरांनी या हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले असल्याचे त्याने सांगितले. हल्ला करणारा जमाव सतत ‘खलिस्तान जिंदाबादचा’ नारा देत होता, असेही त्याने सांगितले. सर्व काही ५ मिनिटांत घडले आणि खलिस्तानच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी हा माझ्यासाठी धडा असावा असे म्हणत ते निघून गेले. तसे नसल्यास ते मला असे आणखी धडे द्यायला तयार आहेत,” तो म्हणाला.
हे ही वाचा:
लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी
बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या
मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान
आम्हाला फार बोलायला लावू नका, तुम्हाला पळता भुई थोडी होईल
न्यू साउथ वेल्स (NSF) पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि भारतीय विद्यार्थ्याला त्याच्या डोक्याला, पायाला आणि हाताला मोठ्या दुखापतीसह वेस्टमीड रुग्णालयात नेण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे.“पोलिसांना सांगण्यात आले आहे की एक २३ वर्षीय व्यक्ती रुपर्ट रस्त्यावरून चालत होता, त्याच्यावर धातूच्या खांबासह सशस्त्र चार जणांनी हल्ला केला,”असे एका पोलिस प्रवक्त्याने अहवालात म्हटले आहे. मेरीलँड्सचे खासदार म्हणाले, “आमच्या स्थानिक समुदायात अतिरेकी किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. या घटनेबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि परिस्थिती जसजशी समोर येईल तसतसे मी त्यावर लक्ष ठेवणार आहे.
जानेवारीमध्ये, तथाकथित ‘पंजाब स्वातंत्र्य सार्वमत’ दरम्यान मेलबर्नमध्ये खलिस्तानी कार्यकर्ते आणि भारत समर्थक निदर्शकांमध्ये संघर्ष झाला. भारताने ऑस्ट्रेलियन सरकारला खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या भारतविरोधी कारवाया आणि देशातील हिंदू मंदिरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्याची मागणी केली होती.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या किंवा दहशतवादाला कायदेशीर मान्यता देणार्यांना जागा देऊ नये, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच नवी दिल्लीत सांगितले की, काही देशांमध्ये खलिस्तानी गटांच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत.