पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक

पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक

पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय वंशाचा विद्यार्थी अचिंथ्य शिवलिंगमला अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून अटक करण्यात आली आहे. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाविरुद्ध संपूर्ण यूएस मधील प्रमुख विद्यापीठांमध्ये निषेध केला जात असताना हा प्रकार समोर आला आहे.
तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील शिवलिंगमला गुरुवारी त्याचा सहकारी हसन सय्यदसह अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मॅककॉश प्रांगणात तंबू ठोकले होते. अधिकाऱ्यांनी याबाद्दल सांगून सुद्धा त्यांच्या सूचनांना न जुमानता आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मात्र या दोघाना काही मिनिटातच अटक करण्यात आली. सुरुवातीला सुमारे ११० जणांच्या जमावाने उपोषण सुरु केले. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांची संख्या नंतर ३०० पर्यंत गेली.

हेही वाचा..

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!

बेंगळुरूची हैदराबादवर मात!

हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; ‘फंक्शनल न्यूट्रिशनल ड्रिंक’ म्हणून नोंद!

याबद्दल प्रिन्स्टन विद्यापीठाचे प्रवक्ते जेनिफर मॉरील म्हणाले की, “सार्वजनिक सुरक्षा विभागाकडून हा प्रकार थांबवण्यासाठी परिसर सोडण्यासाठी वारंवार सांगण्यात आले होते मात्र त्यांनी तसे केले नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
या आठवड्यात कॅम्पसमधील पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांसंदर्भात विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस लाइफचे उपाध्यक्ष रोशेल कॅल्हौन यांनी सांगितले की, या परिसरात ताबा घेणे, छावणी निर्माण करणे किंवा कुठेही झोपणे याला बंदी घालण्यात आली आहे. या सुचनेनंतर कोणीही जर काही कृत्य केले तर त्याला अटक करण्यात येईल आणि कॅम्पसमधून ताबडतोब बाहेर काढण्यात येईल.
याशिवाय शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात १०० हून अधिकाना अटक केल्यानंतर आयव्ही लीग शाळा हार्वर्ड आणि येलसह संपूर्ण यूएस मधील प्रमुख विद्यापीठांमध्ये निदर्शने वाढली आहेत.

Exit mobile version