वेस्ट इंडिजविरोधात खेळल्या जाणाऱ्या पाच टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी भारतीय क्रिकेट संघातर्फे करण्यात आली. त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर, हार्दिक पांड्या कर्णधार असेल.
नव्या ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहित आणि विराटसह अन्य काही मोठ्या क्रिकेटपटूंनाही संघात स्थान दिले गेलेले नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी करणऱ्या तिलक वर्मा याचे पहिल्यांदाच भारतीय संघात आगमन झाले आहे. आयपीएल २०२३मध्ये ऑरेंज कॅप मिळवणाऱ्या यशस्वी जयस्वाल यानेही भारतीय संघात स्थान मिळवले आहे. तर, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग ही तरुणांची फळी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. युजुवेंद्र चहल, रवी बिष्णोई आणि कुलदीप यादव हे अष्टपैलू खेळाडू अक्सर पटेल याच्यासोबत फिरकी गोलंदाजीची बाजू सावरतील.
भारतीय संघाने यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशन यांना निवडले आहे. गेले दीड वर्षे चांगली कामगिरी करणारे सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचाही ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
हे सामने ३ ऑगस्टपासून ते १३ ऑगस्टपर्यंत खेळले जातील. पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा स्टेडियममध्ये रंगेल. तर, दुसरा आणि तिसरा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये रंगेल. त्यानंतर दोन्ही संघ अमेरिकेला रवाना होतील. तेथे फ्लोरिडातील लाँडरहिल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम येथे होणार आहेत.
हे ही वाचा:
शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं
दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, उपराज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
तीन महिने तरी टोमॅटोचे दर चढेच राहणार
भारताचा संघ
इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्याकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्सर पटेल, युजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.