भारतीय जवानांच्या हातात स्वदेशी रायफल्स

भारतीय जवानांच्या हातात स्वदेशी रायफल्स

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांच्या उपस्थितीत न्यू जनरेशन अँटी पर्सनल माईन ‘निपुण’, एके-२०३ रायफल, एफ अन्सास रायफल्स यांच्यासह ड्रोन्स आणि फ्युचरिस्टिक इन्फंट्री सोल्जर ऍज ए सिस्टीम (F-INSAS) भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे ईईएल आणि अन्य भारतीय कंपन्यांनी ही हत्यारे विकसीत केलेली आहेत. आज ही सर्व हत्यारे सैन्यदलाला सुपूर्द करण्यात आली, तसेच नव्या एके २०३ रायफल्सचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले.

चीनला लागून असलेल्या सीमेच्या परिसरातील लँडिंग क्राफ्ट एसॉल्ट क्षमतेचे प्रात्यक्षिकही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दाखवण्यात आले. वास्तविक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्सही भारतीय सैन्यदलाला आज देण्यात आले आहेत. तसेच यावेळी सैन्यदलाला स्वदेशी लढाऊ वाहनेही यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

जन्मठेपेच्या कैद्याला पोलिसांनी दिली ‘मधली सुट्टी’

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

तसेच त्यांच्या हस्ते लडाखच्या सियाचिन ग्लेशियरजवळ असलेल्या परतापूर सैन्यतळावरील सैनिकांसाठी १ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुपूर्द करण्यात आला आहे. या भागात असलेले वीज प्रकल्प हे प्रामुख्याने डिझेलवर अवलंबून असतात, हे डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी इंजिनिअर्सच्या कोअर ग्रुपमे हा सौर उर्जा प्रकल्प निर्माण केला आहे. या सौर उर्जा प्रकल्पातून या सैन्यतळाची विजेची गरज पूर्ण होणार आहे.

Exit mobile version