थंडीच्या काळात जम्मू- काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. जम्मू- काश्मीरच्या पहाडी भागात आपले भारतीय सैन्य तैनात असतात. ऊन, वारा, थंड हवा आदी संकटांना तोंड देत हे जवान त्यांचे कर्तव्य बजावत असतात. जम्मू- काश्मीरमधील जवानांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि जम्मू- काश्मीरच्या फॉरवर्ड पोस्टवर सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवान त्यांचे कर्तव्य बजावत असून त्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. या तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवान ‘खुकरी नृत्य’ करत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH Troops of the Indian Army performed 'Khukuri Dance' in the snow-clad ranges of the Tangdhar sector in the Kupwara district of north Kashmir.
Video source: Indian Army pic.twitter.com/9Rp3V1xNUB
— ANI (@ANI) January 8, 2022
हे ही वाचा:
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक
रतन टाटांचा जीवनप्रवास लवकरच वाचकांच्या भेटीला
या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याचे जवान एक पारंपारिक नृत्य करताना दिसत आहेत. सैन्याचे हे जवान ‘खुकरी’ हा पारंपारिक नृत्य प्रकार सादर करत आहेत. या परिसरात सर्वत्र बर्फ साचला असून बर्फवृष्टी सुरू आहे. तेव्हाच या जवानांनी फडकणाऱ्या तिरंग्या समोर नृत्य सादर केले आहे. या व्हिडीओला पाहून नागरिक मात्र त्यांच्या या उत्साहाला सलाम करत आहेत. उणे तापमान असतानाही जवानांचा कमी झालेला नसून ते त्यांची सेवा बजावत आहेत.