हाडे गोठवणाऱ्या सियाचेनमध्ये फडकला तिरंगा

भारतीय जवानांचा व्हीडिओ झाला व्हायरल

हाडे गोठवणाऱ्या सियाचेनमध्ये फडकला तिरंगा

सियाचेनच्या अत्यंत थंड आणि हजारो फूट उंचीवर, रक्त गोठवणाऱ्या वातावरणातही भारतीय जवानांनी तिरंगा फडकावला. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून लोकांनीही त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत भारतीय जवानांचे कौतुक केले आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे.

एरव्ही चित्रपटगृहात वाजणाऱ्या राष्ट्रगीतात दिसणाऱ्या याच सियाचेनमध्ये तिरंगा फडकताना पाहणे अभिमानास्पद वाटते. एक जवान तिथे प्रचंड हवा असतानाही बर्फात झेंडा रोवताना दिसतो आहे. तर तिथे तैनात असलेल्या जवानांची तुकडी एका रांगेत चालत पुढे सरकते. त्यातील पहिल्या जवानाच्या हाती तिरंगा दिसतो. पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत वाजताना ऐकू येते. बर्भाच्छादित डोंगरांकडे पाहात हे जवान भलामोठा तिरंगा फडकावतात. तो फडकावल्यानंतर संपूर्ण तुकडी त्याला सॅल्युट करते तेव्हा सर्वांचीच छाती अभिमानाने फुलून येते. हे जवान त्यांच्याकडे असलेल्या बंदुका वेगवेगळ्या दिशांना रोखलेले दिसतात, त्यांच्या मध्यभागी एक जवान तिरंगा घेऊन उभा असतो. हे दृश्यही भारावून टाकणारे असते. तिथे वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये बसून जवान तिरंगा घेऊन फेरफटका मारतात तेव्हाही ऊर भरून येतो, कौतुक वाटते.

हे ही वाचा:

बोलण्यातून, वागण्यातून महिलांचा अपमान करू नका

गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल

तुरुंगात असलेल्या मालिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंनी नोंदवला एफआयआर

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हर घर तिरंगा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर घराघरात तिरंगा फडकताना दिसतो. गरीब श्रीमंत सगळेच अमृतमहोत्सवात सामील झालेले दिसतात. दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणासाठी देशातील विविध प्रांतांचे लोक एकत्र आलेले असतात. तिकडे सीमेवर जवानही तिरंगा फडकावून देशाला सलाम करतात. सियाचेनमधील हाडे गोठवणाऱ्या थंडीतला थरार मात्र वेगळाच असतो.

Exit mobile version