पूर्वीचे ट्विटर म्हणजेच आताचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या स्पर्धेत उतरलेले भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ आता बंद झाले आहे. ‘कू’चे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. देशी ‘कू’ ऍप चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, आता हे ऍप बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये संस्थापकांनी ‘कू’ ऍप सुरू करण्यामागची भावना काय होती, हे सांगितले. “लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये तसेच सामान्यांना स्वतःच्या भाषेत सोशल मीडियावर व्यक्त होता यावे, यासाठी आम्ही ‘कू’ ऍपची सुरुवात केली होती. ऍप सारख्या क्षेत्रात अमेरिकेचा दबदबा आहे. आम्हाला वाटलं की भारतही यामध्ये आपले योगदान देऊ शकतो.
मायक्रो- ब्लॉगिंग साईट ‘एक्स’शी स्पर्धा करण्यासाठी हे ऍप लॉन्च करण्यात आले होते. भागीदारीतील अपयश, अप्रत्याशित भांडवली बाजार आणि उच्च तंत्रज्ञान खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थापकांनी सांगितले. यापूर्वी, कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. संस्थापकांनी कंपनीच्या काही मालमत्ता विकल्याबद्दलही बोलले जात आहे. ‘कू’ ऍपची सुरुवात झाली तेव्हा अनेक सेलिब्रिटी, मंत्री यांनी याची जाहिरात केली होती. तसेच भारताबाहेर नायजेरिया आणि ब्राझिलमध्ये ‘कू’ ॲपला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
हे ही वाचा:
वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी
“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”
भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत
पुण्यात झिका रुग्णांची संख्या सातवर
आजपर्यंत तब्बल सहा कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले होते. ‘कू’ ऍपवर दिवसाला २० लाख वापरकर्ते रोज भेट देत होते. तसेच महिन्याला जवळपास १० कोटी युजर हे ऍप वापरत होते. विविध क्षेत्रातील जवळपास नऊ हजार महत्त्वाची मंडळी ऍप वापरत होते. २०२२ साली भारतात ‘एक्स’ला चांगली टक्कर देण्याचे काम ‘कू’ने केले होते.