भारताच्या नौकानयनपटूंनी रचला इतिहास

भारताच्या नौकानयनपटूंनी रचला इतिहास

प्रथमच भारताच्या चार नौकानयपटूंची ऑलिम्पिकसाठी निवड

प्रथमच भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार नौकानयनपटूंचा समावेश होणार आहे. संपूर्ण देशासाठी आणि देशवासीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब ठरली आहे.

विष्णु सर्वानन याची आणि गणपती चेंगप्पा आणि वरूण ठाकूर या जोडीची यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. ओमानला झालेल्या एशिय क्वालिफायर फेरीत जिंकल्यानंतर या तिघांचेही टोकियो तिकीट नक्की झाले आहे. याच्यापुर्वी नेत्रा कुमानन ही भारताची ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला नौकानयनपटू ठरली आहे. मुस्साना ओपन चँपियनशिप स्पर्धा जी एशियन ऑलिम्पिक पात्रतेसाठी खेळवली जाते त्यात विजेतेपद मिळाल्यानंतर ऑलिम्पिकच्या नौकानयन स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

ममतांच्या भवानीपूरमध्ये अमित शहांचा झंझावात

यावेळी प्रथमच भारत प्रथमच ऑलिम्पिकच्या तीन वेगवेगळ्या नौकानयन स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. यापूर्वी चारवेळा भारताने दोन नौकानयनपटूंच्या सहाय्याने ऑलिम्पिकमधल्या एकाच नौकानयन स्पर्धेत भाग घेतला आहे.

“होय हा इतिहास रचला आहे. चार भारतीय नौकानयनपटूंची ऑलिम्पिकच्या तीन नौकानयन खेळांसाठी निवडले गेले आहेत. आत्तापर्यंत आपण भाग नौकानयनाचे भाग घेत असलेले हे सर्वात जास्त खेळ आणि खेळाडू आहेत.” यॉचिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सह-सचिव कॅप्टन जितेंद्र दिक्षीत यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) किरेन रिजीजू यांनी ट्वीट केले आहे.

गुरूवारी सर्वानन याची एका वर्गातून टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली तर चेंगप्पा आणि ठक्कर या जोडीची नंतर दुसऱ्या एका वर्गातून ऑलिम्पिकसाठी निवड झाली.

Exit mobile version