भारतीय रेल्वे देशातील रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण करणार आहे. त्यावर मंत्रालयाने वेगाने काम सुरू केले आहे. आतापर्यंत, ८२ टक्के रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा पर्यावरणाला होणार आहे . २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेने १,२२३ मार्ग किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ या कालावधीत ८९५ किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीपेक्षा हे प्रमाण ३६.६४ टक्क्यांनी अधिक आहे.
भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचे विद्युतीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ उत्तम इंधन ऊर्जा वापरणार नाही तर त्यामुळे उत्पादन वाढेल, इंधनावरील खर्च कमी होईल. परकीय चलनाचीही बचत होईल. भारतीय रेल्वेच्या इतिहासात २०२१-२२ दरम्यान ६,३६६ किलोमीटर मार्गाचे विक्रमी विद्युतीकरण करण्यात आले. यापूर्वी, २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ६,०१५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले होते.
भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज जाळ्याच्या ६५,१४१ मार्ग किलोमीटरपैकी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत५३,४७० ब्रॉडगेज मार्ग किलोमीटरचे विद्युतीकरण झाले आहे, जे एकूण ब्रॉडगेज नेटवर्कच्या ८२.०८ टक्के आहे. रेल्वे मंत्रालय गाड्यांच्या संचलनात आणि बांधकामात विविध बदल करत आहे, हे बदल पर्यावरण आणि निसर्ग या दोहोंचे रक्षण करण्यासाठी केले जात आहेत.
हे ही वाचा :
कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय
मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा
भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती
जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतीय रेल्वेने पुढील सात वर्षांत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आहे. हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य दोन टप्प्यांत साध्य करण्याची रेल्वेची योजना आहे. पर्यावरणपूरक आणि प्रदूषण कमी करणारे रेल्वेचे विद्युतीकरण २०१४ पासून जवळपास दहा पटीने वाढले आहे. रेल्वेने डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण करण्याची योजना आखली आहे.