भारतीय रेल्वेने एक नवा विक्रम रचत अवघ्या २० दिवसांत उड्डाणपूल बांधायची किमया साधली आहे. वलसाड येथे या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. वलसाड येथील माल वाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या मार्गिकेवरील हा उड्डाणपूल आहे. भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील सार्वजनिक कंपनी, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून या पुलाची तोडणी आणि बांधकाम करण्यात आले आहे.
पश्चिम समर्पित मार्गिकेवरील, वैतरणा-सचिन भागात, वलसाड गावात जाण्यासाठीच्या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे या मार्गिकेवर उड्डाणपूल टाकण्यात यावा अशी मागणी केली जात होती. मात्र या भागात बांधकामाच्या दृष्टीने अनेक मर्यादा होत्या. रेल्वेरूळ टाकण्याच्या कामामुळे इथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करणे आव्हानात्मक होते. या मार्गिकेवर, अत्याधुनिक पद्धतीने नवे रूळ टाकण्याचे काम सुरु आहे. अशा परिस्थितीत उड्डाणपुलाच्या काम सुरु केले तर हे रूळ टाकण्याचे काम बाधित होण्याची शक्यता होती.
हे ही वाचा:
भारत आणि फिजीमध्ये नवा सामंजस्य करार
ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ
उद्धव ठाकरे नाना पटोलेंवर नाराज?
उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका
पण हे आव्हान स्विकारण्याचा निर्धार भारतीय रेल्वेतर्फे करण्यात आला. या समस्यांवर तोडगा शोधून प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चय केला गेला. समस्या निवारणासाठी अनेक बैठकांमध्ये चर्चा झाल्यावर एक अभिनव तोडगा शोधून काढण्यात आला. या उड्डाणपुलाच्या मुखाशी आधीच तयार केलेले १६ x १० मीटर आकाराचे प्रीकास्ट बॉक्स लावण्यात आले. त्यातही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेल्या अशा या रस्त्यावरची वाहतूक थांबवून हे काम करणे सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे, हे पूर्ण काम केवळ २० दिवसात संपवण्याचे काटेकोर नियोजन रेल्वेमार्फत केले गेले आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली.
अशाप्रकारे अवघ्या २० दिवसांत भारतीय रेल्वेने अशक्यप्राय वाटणारे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या कार्यासाठी भारतीय रेल्वेचे कौतुक केले असून त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर हे संपूर्ण बांधकाम कशाप्रकारे पार पडले याची झलक देणारा एक व्हिडीओही प्रसारित केला आहे.
कोविड की चुनौतियों के बीच, भारतीय रेल द्वारा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरीडोर पर वलसाड रोड ओवर ब्रिज का निर्माण 20 दिन के रिकार्ड समय में पूर्ण किया गया।
📖 https://t.co/YwsVnyongW pic.twitter.com/4t1bBCoEzf
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 22, 2021