देशातील काही राज्यांमधून वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत या गाड्या इतर राज्यांतूनही धावताना दिसणार आहेत . रेल्वे मंत्र्याने या महिन्यात आणखी २०० नवीन वंदे भारत गाड्या सुरु करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सध्या रेल्वेच्या चेन्नई कोच फॅक्टरीमध्ये ७८ वंदे भारत गाडयांचे उत्पादन करण्यात येत आहे. २०२५ च्या अखेरीस २७८ वंदे भारत गाड्या तयार होतील तर २०२७ पर्यंत सर्व ४७८ वंदे भारत गाड्या रुळावर धावताना दिसणार आहे.
केंद्र सरकारने देशभरात ४७८ वंदे भारत गाड्या चालवण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ७८ गाड्यांचे काम वेगाने सुरू आहे. या सर्व गाड्या चेअर कार मॉडेलवर आधारित आहेत. नवीन ४०० वंदे भारत गाड्या स्लीपर क्लासमध्ये तयार केल्या जातील. या महिन्यात २०० च्या निविदा निघणार आहेत. या २०० वंदे भारत गाड्या स्लीपर क्लास असतील. या सर्व २७८ गाड्या जास्तीत जास्त १६० च्या वेगाने धावतील. या सर्व स्टेनलेस स्टीलच्या बनवल्या असतील. असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस २०० वंदे भारत गाड्यांची निविदा प्रक्रिया अंतिम केली जाईल. यामध्ये या गाड्या कोणती कंपनी तयार करणार, हेही ठरवले जाणार आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या कंपन्या गाडयांचे संच बनवतील. निविदा प्रक्रियेत सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपनीला १२० गाड्या बनवण्याची ऑर्डर मिळेल. तर निविदा प्रक्रियेतील क्रमांक दोनच्या कंपनीला ८० वंदे भारत गाड्या बनवण्याचे काम देण्यात येणार आहे.