23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषभारतीय रेल्वेवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

भारतीय रेल्वेवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब ठरेल अशा चिनाब नदीवरच्या पुलाची निर्मीती भारतीय रेल्वेने केली आहे. त्यामुळे काश्मिरच्या बारामुल्ला पर्यंत रेल्वे पोहोचू शकणार आहे.

Google News Follow

Related

भारतीय रेल्वेने चिनाब नदीवर कंसाकृती पूल बांधून एक इतिहास रचला आहे. या पूलाच्या पूर्ण होण्याबरोबरच भारतीय रेल्वेची दौड आता काश्मिर मधल्या बारामुल्ला पर्यंत पोहोचणार आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज ठरला आहे.

चिनाब नदीवरील हा पूल उत्तर रेल्वेवरील उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे मार्गावरील हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा पूल नदीच्या तळापासून ३५९मी. उंच आहे. या पूलाची लांबी १.३ किमी आहे. या पूलाच्या बांधणीसाठी ₹१,४८६ कोटी खर्च आला. या पुलाची उंची आयफेल टॉवरपेक्षा ३५ मी.ने जास्त आहे.

हे ही वाचा:

जेव्हा अजित दादाच मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत

काय डेंजर वारा सुटलाय

मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

उत्तर रेल्वेचे व्यवस्थापक आशुतोष गांगल यांनी याबद्दल सांगितले की, “हा रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस आहे आणि काश्मिरल्या बाकीच्या देशाशी जोडणाऱ्या युएसबीआरएल रेल्वे प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा आहे. अजून अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल.”

या पुलाची वैशिष्ट्ये:

  • २६६ किमी प्रतितास वारा सहन करण्याची क्षमता
  • जोरदार धमाक्यातही उभे राहण्याची क्षमता
  • पुलाच्या दोनपैकी एक पायर काढला तरीही पूल ३० किमी प्रतितास वेगावर कार्यरत राहू शकतो.
  • हा पूल भारतातील सर्वात मोठ्या भूकंपांची शक्यता असलेल्या क्षेत्रातील धक्क्यांना सहन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
  • या पूलाची रचना उणे १० अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस तापमान झेलण्यासाठी बनविले आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा