भारतीय रेल्वे सातत्याने विविध अभियांत्रिकी चमत्कारांची नोंद करत असते. अशाच एका चमत्काराची नोंद भारतीय रेल्वेने आज केली आहे. आसाममधल्या ब्रम्हपुत्रेवर बांधण्यात आलेला नरनारायण सेतू या २ किमी लांबीच्या पुलावरील रेल्वे ट्रॅकला आजपासून रेल्वेने अधिकृतरित्या सेवेत दाखल करून घेतले आहे.
हे ही वाचा:
नागपूरमधील इंटर्न डॉक्टर संपावर; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता
कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन
आक्षेपार्ह ट्वीटमुळे ट्वीटरकडून कंगनाचे अकाऊंट बंद
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या बाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की,
आसाम ब्रह्मपुत्रा नदीवर नरनारायण सेतूच्या नव्या ट्रॅकला रेल्वेने सेवेत दाखल करून घेतले. या अत्यंत गुंतागुतीच्या प्रकल्पाचे पुर्णत्वास जाणे न्यु बोनगाईगाव ते कामाख्या मार्गाच्या दुहेरीकरणातील महत्त्वाचा चरण आहे. २०१९ मध्ये सरकारने २०४२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. या प्रकल्पाचे काम उत्तर सीमावर्ती रेल्वेमार्फत पाहिले जात आहे. हा प्रकल्प २०२२-२०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Railways has commissioned a new track on the Narnarayan Setu bridge across Brahmaputra river in Assam.
Completion of this complex work is an important step forward in the New Bongaigaon to Kamakhya doubling project. pic.twitter.com/tpKtbLOzNc
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 4, 2021
नरनारायण सेतू हा ब्रह्मपुत्रेवरचा तिसरा सेतू आहे. आसाममध्ये बांधलेला हा सेतू दुमजली आहे. या पुलाच्या वरच्या भागात रस्ता आहे आणि खालून रेल्वेमार्ग घालण्यात आला आहे. या पुलाची लांबी २ किमीपेक्षाही अधिक आहे. हा पुल उत्तरेला बोनगाईगाव जिल्ह्यातील जोगीघोपा शहराला दक्षिणेकडे गोलपारा जिल्ह्यातील पंचरत्न शहराशी जोडतो. या पुलाचे उद्घाटन १५ एप्रिल १९९८ रोजी तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले होते.