23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषभारताची पदकांची 'उंच उडी'! एकाच खेळात २ पदके

भारताची पदकांची ‘उंच उडी’! एकाच खेळात २ पदके

Google News Follow

Related

टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारतीय ऍथलिट्सचा बोलबाला हा सुरुच आहे. मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी भारताने आत्तापर्यंत आणखीन तीन पदके आपल्या नावावर केली आहेत. हाय जंप अर्थात उंच उडी या क्रीडा प्रकारात भारताने एक नव्हे तर तब्बल दोन पदके जिंकली आहेत. तर त्या आधी सिंहराज अधनान याने शूटिंग या क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताच्या नावे आत्तापर्यंत एकूण दहा पदके जमा झाली आहेत.

सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या उंच उडी प्रकाराच्या अंतिम फेरीत भारताचे मरियप्पन थंगावेलू आणि शरद कुमार हे सहभागी झाले होते. या पैकी मरियप्पन हा तर गेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता खेळाडू होता. या दोघांकडूनही भारतीयांना पदकाची अपेक्षा होती आणि त्यांनी कोणाचीच निराशा केली नाही.

हे ही वाचा:

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

मरियप्पन याने १.८६ मीटर इतकी उंच उडी मारत रौप्यपदक आपल्या नावे केले. तर शरद कुमार याने १.८३ मीटर उंच उडी मारून कांस्य पदकावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत अमेरिकेचा सॅम ग्र्यु हा सुवर्ण पदक विजेता ठरला. त्याने १.८८ मीटर इतकी उंच उडी मारली.

मरियप्पन आणि शरद यांच्या कामगिरी मुळे सबंध भारत देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून या दोघांचे कौतुक केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा