भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. सुनीता विल्यम्स या अंतराळ मोहिमेवर अंतराळयान उडवणारी पहिली महिला ठरली आहे. सुनीता विल्यम्स दुसऱ्या सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या आहेत.
सुनीता विलियम्स आणि अंतराळवीर बॅरी बुच विल्मोर हे नासाच्या व्यावसायिक क्रू मोहिमेअंतर्गत स्टारलायनर अंतराळयानात सवार होणारे पहिले अंतराळवीर ठरले आहेत. हे यान रॉकेट कंपनी युनायटेड लाँज अलायन्स (यूएसए)चे ऍटलास-५ रॉकेटवर अंतराळात पाठवण्यात आले आहे.विशेष म्हणजे या मोहिमेवर अंतराळयान उडवणारी सुनीता विल्यम्स पहिली महिला ठरली आहे. ५८ वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी ‘बुच’ विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं आहे.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?
इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हल्ला; २७ जण ठार
अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज
अवघी २.५ टक्के मते, आठ जागांवर विजय
दरम्यान, अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली होती.हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर ‘स्टारलायनर’ अंतराळयान झेप घेईल असे नासाकडून सांगण्यात आले होते.अखेर यानातील बिघाड दुरुस्त करून हे यान काल आपल्या दिशेने रवाना झाले आहे.
सुनीता यांचा विक्रम
सुनीता विल्यम्स अंतराळात विक्रमी ३२२ दिवस राहिल्या आहेत. पहिल्यांदा ९ डिसेंबर, २००६ रोजी त्या अंतराळात गेल्या होत्या. त्या २२ जून २००७पर्यंत तिथे राहिल्या. त्यानंतर १४ जुलै, २०१२ रोजी त्या पुन्हा अंतराळप्रवासासाठी गेल्या. तिथे त्या १८ नोव्हेंबर, २०१२पर्यंत राहिल्या.