अमेरिकेत हिंदूंवरील हल्ल्यांबद्दल भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता!

समुदायाविरुद्ध मोठे षडयंत्र, श्री ठाणेदार

अमेरिकेत हिंदूंवरील हल्ल्यांबद्दल भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता!

अमेरिकेत हिंदू धर्म आणि हिंदूंवर हल्ल्याच्या वाढत्या प्रमाणावर भारतवंशी खासदार श्री ठाणेदार यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी याला मोठे षडयंत्र म्हटले आहे. ठाणेदारांव्यतिरिक्त भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, एमी बेरा आणि प्रमिला जयपाल यांनीही अलीकडेच न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली होती आणि या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा, असे आवाहन केले होते.

‘हिंदू ॲक्शन’ या संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ठाणेदार म्हणाले की, अमेरिकेत हिंदू धर्मावर वाढते हल्ले मी पाहत आहे.अनेक खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचेही मी पाहिले आहे. हल्ला केलेल्या आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अटक तर लांबची गोष्ट.

ते पुढे म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत अशा हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मला वाटते की, या समाजाविरुद्ध हे मोठे षडयंत्र आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी समाजातील लोकांना संघटित व्हावे लागेल. हिंदू कुटुंबात जन्माला आल्याने मला हिंदू म्हणजे काय हे माहीत आहे. हिंदूंवरील हे हल्ले पाहून मी माझ्या चार सहकाऱ्यांसह न्याय विभागाला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा..

मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!

दिनेश कार्तिक बनणार टीम इंडियाचा फिनिशर?

ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक

भाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमध्येही हल्ले होत आहेत.तसं पाहिलं तर संपूर्ण अमेरिकेत हिंदू धर्म आणि हिंदूंवर हल्ले होत आहेत. त्यांनी आरोप करत पुढे म्हटले की, स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी या हल्ल्यांची चौकशी केली, परंतु पुढे काहीही केले नाही. स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीशी समन्वय साधण्याची गरज असल्याचे ठाणेदार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, यावेळी समाजातील लोकांनी उभे राहिले पाहिजे आणि आम्हाला सांगावे लागेल की आम्ही देशात समानतेची मागणी करत आहोत.याठिकाणी आम्ही न्यायाची मागणी करत आहोत आणि यापुढे आम्ही असा द्वेष सहन करणार नाही.

 

Exit mobile version