कॅनडातील ओंटारिओ येथे राहणारे भारतीय वंशाचे जोडपे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीचा घराला लागलेल्या आगीत संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. ही दुर्घटना ७ मार्च रोजी घडली होती. मात्र त्यांच्या अवशेषांची तपासणी केल्यानंतर शुक्रवारी या घटनेची नोंद करण्यात आली.
हे कुटुंब बिग स्काय वे आणि ब्रॅम्प्टन भागातील व्हॅन कर्क ड्राइव्ह परिसरात राहात होते. या कुटुंबाच्या शेजाऱ्याने येथे आग लागल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र या आगीत नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत निश्चित माहिती नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. जेव्हा संपूर्ण आग विझली, तेव्हा तेथे मानवी अवशेष आढळले.
मृतांमध्ये ५१ वर्षीय राजीव वारिकू, त्यांची पत्नी ४७ वर्षीय शिल्पा कोठा आणि त्यांची १६ वर्षांची मुलगी मेहेक वारिकू यांचा समावेश आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत पोलिसांनी आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती दिली.
हेही वाचा :
१०० कोटींची लाच; १० पेक्षा अधिक मोबाइल बदलले
मविआने पडणाऱ्या जागा दिल्या; वंचितची तक्रार
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ४५ उमेदवार शर्यतीत
‘भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी दबाव आणणार नाही’
‘सध्या तरी आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. ही आग अपघाताने लागली नसावी, असा अंदाज आहे, त्यामुळे या घटनेतून संशयाचा धूर येतो आहे,’ असे पोलिसाने सांगितले. या मृत्यूचा तपास सुरू असून या दुर्घटनेबाबत काहीही माहिती असल्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.