27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषभारतीय नौदलाला मिळणार नवी 'शक्ती'

भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’

Google News Follow

Related

भारतीय नौदलाला आता नवी ‘शक्ती’ मिळणार आहे. कारण भारतीय नौदलच्या लढाऊ जहाजांना सुरक्षा कवच पुरवणारी ‘शक्ती’ ही नवी प्रगत सुरक्षा प्रणाली औपचारिकरित्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अधाकृत समर्पण करण्यात येईल. झांसी येथे सुरू असलेल्या ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी  होणाऱ्या समारंभात नौदलाच्या जहाजांना हे संरक्षक कवच पुरवण्यात येईल.

‘शक्ती’ प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीचे डिझाईन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ (DRDO) च्या  हैद्राबाद येथील संरक्षण इलेक्ट्रॉनिक संशोधन प्रयोगशाळेत बनवण्यात आले आहे. तेथेच ते विकसित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाच्या प्रमुख युद्धनौकांवरुन ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. भारताच्या शत्रू राष्ट्रांच्या पारंपरिक आणि आधुनिक रडारच्या कामात व्यत्यय आणणे, ही रडार शोधून काढत त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांची ओळख पटविणे आणि ते निकामी करणे यासाठी ही प्रणाली उपयोगात आणली जाईल.

हे ही वाचा:

न्यूझीलंड सोबत आज दुसरा टी२० सामना! भारताला मालिका विजयाची संधी

बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही

 

मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

सागरी युद्धात, ‘शक्ती’ ई डब्ल्यू (EW) प्रणाली आधुनिक रडार आणि नौका विरोधी क्षेपणास्त्रे यापासून इलेक्ट्रॉनिक कवच प्रदान करेल. यामुळे युद्धनौकांना वर्चस्व आणि टेहळणीची क्षमता मिळेल. भारतीय नौदलाच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीची जागा , ही नवी प्रणाली घेणार आहे. पहिली शक्ती प्रणाली आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेवर बसविण्यात आली आहे आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांतवर बसविण्यात येत आहे. एकूण १८०५ कोटी रुपये खर्चून, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे बारा शक्ती प्रणाली बनविल्या जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा