बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका

बिघाडामुळे जहाजे दोन दिवस समुद्रात उभी होती

बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका

भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात अडकलेल्या मच्छिमारांना सुखरूप मायभूमीवर आणले आहे. बंगालच्या उपसागरात तीन मासेमारी करणारी जहाजे अडकून पडली होती. खराब वातावरणामुळे आणि बिघाडामुळे ही जहाजे खोल समुद्रात उभी होती. याची माहिती मिळताच भारतीय नौदलाच्या जवानांनी ३६ मच्छिमारांना सुखरूप परत आणले.

तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून १३० नॉटिकल मैल अंतरावर तीन मासेमारी जहाज अडकले होते. खराब हवामान, इंधन तरतुद नसल्यामुळे आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन दिवसांपासून ही जहाजं समुद्रात अडकून पडली होती. या जहाजांवर ३६ माछिमार देखील होते. या अडकलेल्या मच्छिमारांना २८ जुलै रोजी चेन्नई बंदरात सुखरूप आणण्यात आले, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. भारतीय नौदल जहाज खंजरने या जहाजांवरील ३६ भारतीय मच्छिमारांना सुखरूप परत आणले.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारचे संशोधन जहाज समुद्रात भरकटले होते. तातडीने या जहाजाने मदतीचा संदेश पाठवल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे जवान तिथे पोहचले आणि त्यांनी हे जहाज दुर्घटना होण्यापासून वाचविले. एनआयओच्या संशोधन मोहिमेवर असलेल्या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. हे जहाज कारवारजवळ वाहून जात होते. दरम्यान, ते खडकाळ भागाला धडकण्यापासून वाचविण्यात तटरक्षक दलाल यश आले.

हे ही वाचा:

खांद्यात लागलेली गोळी घेऊन ६०० किमी प्रवास, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धावपळ

पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

पुण्यात गेल्या ७ महिन्यात ६५ सराईत गुन्हेगार हद्दपार

चमत्कार!! अंगावर वीज पडल्याने कोमात गेलेली विद्यार्थीनी होतेय पूर्ववत

बोर्ड आर. व्ही. सिंधू साधना नावाचे एक जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकून पडले होते. जेव्हा जहाजाचा डिस्ट्रेस सिग्नल मिळाला तेव्हा ते जमिनीपासून अंदाजे २० नॉटिकल मैल दूर होते. या जहाजामध्ये आठ प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ शास्त्रज्ञ आणि एकूण ३६ कर्मचारी होते.

Exit mobile version