भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पांढऱ्या शुभ्र गणवेषावरील नव्या स्कंधचिन्हांवर शिवमुद्रा विराजमान झाली आहे. ऍडमिरलस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्कंधचिन्हांवर आता शिवमुद्रा व त्या शिवमुद्रेच्या आत ‘अशोक सिंह’ चिन्हांकित केलेले असेल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल कार्यक्रमात याबाबत घोषणा केली होती. ती आता अंमलात आली आहे. एक वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले होते. हा नवा ध्वजही शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने प्रेरित आहे.
‘ब्रिटिशांच्या गुलामी मानसिकतेतून मुक्ती व आपल्या वारसाबद्दल अभिमान’, असे नमूद करत नौदल अधिकाऱ्यांच्या स्कंधचिन्हांत (एपेलेट्स) लवकरच बदल होतील व त्यात देशाच्या लढाऊ नौदलाची स्थापना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेचा समावेश केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या तारकर्ली किनाऱ्यावर झालेल्या कार्यक्रमात घोषित केले होते. या घोषणेनंतर १ जानेवारीपासून हा बदल अंमलात आणणार असल्याचे नौदलाने जाहीर केले आहे.
हे ही वाचा:
‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’
उत्तर मेक्सिकोमध्ये पार्टीत बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात सहा ठार
मा शारदा मंदिर मुक्त करण्यासाठी भारताला साकडे!
मोदींनी मीरा मांझींच्या हातचा चहा प्यायल्यावर त्या म्हणाल्या, माझा देव घरी आला!
सर्वांत मोठा बदल शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा असेल. आता अशोक सिंह हे ब्रिटिशांच्या क्राऊनमध्ये न ठेवता शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत चिन्हांकित असेल. त्यानंतर त्यावर नौदलाचे चिन्ह असेल.
अशी आहेत नवी स्कंधचिन्हे
सर्वांत वर नौदलाचे एक बटन, जे सुवर्णरंगाचे आहे.
त्याखाली लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर अशोक स्तंभ आहे.
त्याखाली एक तलवार आणि दुर्बिण आहे.
त्यानंतर रँकनुसार त्यावर तारे आहेत.
नव्या स्कंधचिन्हांचे अर्थ
सुवर्ण नौदल बटण – गुलामीच्या मानसिकतेचा त्याग
शिवाजी महाराजांची अष्टकोनातील राजमुद्रा – आठही दिशांच्या विकासाची दूरदृष्टी
भवानी तलवार – राष्ट्राला ताकद देत समुद्री वर्चस्वासह युद्ध जिंकणे, शत्रूवर मात करणे व प्रत्येक आव्हानाचा निर्धाराने सामना करणे
प्राचीन काळातील दुर्बिण – दूरदृष्टी ठेवून बदलत्या जगावर करडी नजर ठेवणे
ऍडमिरलच्या तीन रँकचा समावेश
रिअर ऍडमिरल – दोन तारे
व्हाइस ऍडमिरल – तीन तारे
ऍडमिरल – चार तारे