भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

नौदलाच्या जहाजातून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

भारतीय नौदलाचा एक खलाशी नौदलाच्या जहाजातून बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे.साहिल वर्मा असे बेपत्ता झालेल्या खलाशाने नाव आहे. साहिल वर्मा हा खलाशी २७ फेब्रुवारी रोजी नौदलाच्या जहाजातून बेपत्ता झाला आहे.नौदलाच्या जहाजातूनच बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय नौदलाच्या मुंबई मुख्यालय असलेल्या वेस्टर्न नेव्हल कमांडने (Western Naval Command) खलाशाच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे.या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या संदर्भात वेस्टर्न नेव्हल कमांडने सांगितले की, खलाशाचा शोध सुरू असून तपास जसजसा पुढे जाईल, तशी माहिती देण्यात येईल.

हे ही वाचा:

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

टेक कंपन्यांना ‘एआय’ प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

क्रिकेट सामन्यामुळे झाला होता आंध्र प्रदेशातील ‘तो’ रेल्वे अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, खलाशी साहील वर्मा ‘सीमन-II’ या भारतीय नौदलाच्या जहाजावर कर्तव्यावर होता. दरम्यान, २७ फेब्रुवारीपासून तो समुद्रात बेपत्ता झाला.साहील वर्माचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल ताबडतोब जहाजे आणि विमानांसह शोधमोहीम तातडीने राबवली आहे.मात्र, अद्याप शोध लागला नाही.ही शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे, अशी माहिती नौदलाने ट्विट करून दिली.

नौदलाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी नौदलाच्या उच्चस्तरीय समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.यातून तपशीलवार माहिती मिळेल.खलाशी बेपत्ता होण्याची घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप काहीच माहिती उपलब्ध नसून सध्या याचा तपास सुरु आहे, असे नौदलाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version