भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी

भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना एक फोन केल्यावर अमेरिकेने पुढच्या ४८ तासात भारताला ऑक्सिजन आणि लसीचा कच्चा माल पुरवायला तयारी दर्शवली आहे. भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना अत्यंत हिंमतीने करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून विविध देशांनी भारताला सहाय्य केले आहे. इतके दिवस भारताला लसोत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देखील द्यायला देखील आधी नकार दिलेल्या अमेरिकेने कच्चा माल तर पुरवलाच शिवाय आता ३१८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देखील दिले जात आहेत.

कोवीड महामारीत अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करेल असे बायडन प्रशासनाकडून आश्वस्त करण्यात आले आहे. मैत्री धर्म निभावत अमेरिका भारताला शक्य ते सर्व सहकार्य करेल असे सांगण्यात येत आहे. अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये रविवारी बातचीत झाली. त्यानंतर अमेरिकेकडून भारताला सर्व आवश्यक त्या कच्च्या मालाचा पुरवठा करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवन यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून कोविशील्ड लसीचा कच्चा माल पुरवठा रोखला गेला होता.

यातून अनेक वर्ष गुप्तहेर राहिलेल्या अजित डोवाल यांची केवळ दहशतवादी आणि नक्षलवाज्ञांना जेरीस आणण्यात निपुणता नसून, भल्याभल्या मुत्सद्दींनादेखील जेरीस आणण्याचे त्यांचे कौशल्य दिसून येते.

हेही वाचा:

मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत

पारल्यात नवे कोरोना केंद्र

भारतात ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता नरेंद्र मोदी सरकारने राज्याराज्यांत ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी जी आश्वासक पावले उचलली आहेत, तशीच परदेशातूनही ऑक्सिजनचा पुरवठा होईल, याची काळजी घेतली आहे. आता सौदी अरेबियातून ८० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन आणला जात आहे. अदानी उद्योगसमूह आणि लिंडे कंपनी यांच्या सौजन्याने या ऑक्सिजनचा साठा भारतात आणण्यात येणार आहे. याशिवाय आता संयुक्त अरब अमिरातीकडूनही १२ क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅंक हे भारतात पाठवण्यात येत आहेत.

Exit mobile version