27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषभारतीय हॉकी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी...

भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी !

एफआयएचच्या निर्णयावर हॉकी इंडिया करणार अपील

Google News Follow

Related

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार खेळ दाखवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, याआधीच संघाला मोठा झटका बसला आहे. स्टार खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत तो आता उपांत्य फेरीत खेळताना दिसणार नाही. अमित हा उत्कृष्ट बचावपटू असून संघात त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचा बचाव कमकुवत होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) रोहिदासवर ही बंदी घातली आहे. एफआयएचच्या निवार्णायावर हॉकी इंडियाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे हॉकी इंडियाने सांगितले आहे.

भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन हॉकी सामना काल पार पडला. या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटवर मात करत विजय प्राप्त केला. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला दुसऱ्या सत्रात मोठा धक्का बसला. अमित रोहिदासला रेड कार्ड देण्यात आल्याने तो संपूर्ण सामन्यातून बाहेर फेकला गेला. यानंतर भारतीय हॉकी संघाला संपूर्ण सामना फक्त १० खेळाडूंसह खेळावा लागला. वास्तविक, सामना सुरु असताना भारतीय खेळाडू अमित रोहिदासची हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनचा खेळाडू विल कॅलन याच्या चेहऱ्यावर लागली. यामुळे अमितला रेड कार्ड देण्यात आले. या कार्डमुळे त्याच्यावरही ही बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा..

मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने दिली ॲसिड हल्ल्याची धमकी

गिरणा नदीत अडकलेल्या १२ तरुणांना हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू !

कलम-३७० हटवून आज ५ वर्षे पूर्ण, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक !

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार, ९८ जणांचा मृत्यू !

दरम्यान, एकाद्या खेळाडूला जाणूनबुजून दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास रेडकार्ड दिले जाते. हॉकी इंडियाने आता या निर्णयाविरुद्ध अपील केले आहे. यावर आता एफआयएच ज्युरी खंडपीठ निर्णय देणार आहे. जर एफआयएच ज्युरीलाही अमित रोहिदासकडून ‘जाणूनबुजून प्रयत्न’ केले गेले नाही असे वाटले तर त्याचे लाल कार्ड रद्द केले जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा