केंद्र सरकार तर्फे शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. संसदेच्या शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रिडा विषयक स्थायी समितीतर्फे या प्रकरणी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी देशभरातून सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.
संसदेच्या शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रिडा विषयक स्थायी समितीने काढलेल्या एका परिपत्रकानुसार या समितीने शालेय पाठ्यपुस्तकांची रचना आणि आणि त्यातील मजकुरातील सुधारणा हा विषय परीक्षणासाठी विचाराधीन घेतला आहे. या सुधारणांचा मुख्य भर हा प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. यामध्ये पाठ्यपुस्तकातून अनैतिहासिक तथ्ये तसेच महापुरुषांची बदनामी करणारा मजकूर हा हटवण्यात येणार आहे. तर इतिहासातील प्रत्येक कालखंडाला समान महत्त्व दिले जाणार आहे.
तर या सोबतच इतिहासातील कर्तृत्ववान महिलांच्या कामगिरीवर भर देऊन त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात गार्गी, मैत्रेयी यांसारख्या महिलांसोबतच झाशीची राणी, राणी चेन्नम्मा चांद बीबी, झलकारी बाई अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचा समावेश असणार आहे.
हे ही वाचा:
अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र
भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब
महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?
निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच
तर सरकारच्या या उपक्रमासाठी देशभरातून सूचना मागविण्यात आल्या असून यात विद्यार्थी, शिक्षक तसेच देशभरातील तज्ञांनी आपल्या सूचना हिंदी अथवा इंग्रजीतून ईमेल द्वारे कळवाव्यात असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. यासाठी rsc_hrd@sansad.nic.in हा ईमेल आयडी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. बुधवार ३० जून २०२१ ही सूचना पाठविण्याची अंतिम तारीख आहे.
केंद्रातील मोदी सरकारने शिक्षण विषयक सुधारणांवर सुरवातीपासूनच भर दिला आहे. गेल्याच वर्षी सरकारमार्फत नव्या शिक्षण धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. तर या धोरणाची उद्दिष्टे लवकरात लवकर साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.