रेमडेसिवीरच्या किंमतीत घट

रेमडेसिवीरच्या किंमतीत घट

कोरोनाच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत आता घट झाली आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने या संबंधीचा मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता रेमडेसिवीरची किंमत ही कमी झाली असून काही इंजेक्शन्सची किंमत ही तब्बल ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून ते मोदी सरकारचे आभार मानत आहेत.

भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई यशस्वीपणे लढण्यासाठी भारत सज्ज असून केंद्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत. रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना विरुद्धच्या लढाईत अतिशय महत्वाचे मानले जाते. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठा यात तफावत जाणवू लागली आहे. मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी. रेमडेसिवीरच्या काळाबाजाराच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच मोदी सरकारने रेमडेसिवीरची निर्यात करण्यावर बंदी घातली आणि उत्पादन वाढवण्यासाठी निर्णय घेतला. त्याचवेळी रेमडेसिवीरची किंमत कमी केली जाईल असे सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस

मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी

गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?

… कारण ठाकरे सरकार निकम्मे आहे!

त्याप्रमाणेच आता रेमडेसिवीरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी शनिवारी संध्याकाळी ट्विट करत ही खुशखबर देशातील जनतेला दिली. यावेळी मांडवीय यांनी रेमडेसिवीरची जुनी किंमत आणि कमी झालेली किंमत असा एक तक्ता दिला आहे.

Exit mobile version