कोविड रूग्णालयात उपचार घ्यायला पॉझिटिव्ह रिपोर्ट बंधनकारक नाही

कोविड रूग्णालयात उपचार घ्यायला पॉझिटिव्ह रिपोर्ट बंधनकारक नाही

भारत सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना

भारत सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासीत प्रदेशांना कोवीड संदर्भातील अत्यंत महत्वाच्या अशा नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे देशभरातील कोवीड रुग्णांना रुग्णालयात दाखला मिळताना तसेच उपचारतही मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतात सध्या कोरोनाचा फैलाव वाढलेला आहे. रोज कोरोनाचे काही लाख नवे रुग्ण भारतात आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळवायलाही कष्ट पडत आहेत. अशातच या रुग्णांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

कोविडविरोधात डीआरडीओचे ‘अस्त्र’

करार आणि करारी

शिवसेनेने भ्रष्टाचार शिरोमणी सोनियांची तळी उचलणे स्वाभाविकच

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

शनिवार, ८ मे रोजी भारत सरकारने कोवीड संदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून या नव्या सूचनांची माहिती दिली. केंद्राकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रादेशांना या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून त्यानुसारच त्यांना कार्यवाही करायची आहे.

काय आहेत या नव्या सूचना?

भारत सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत

१) कोविड रुग्णालयात रुग्णाला भरती होण्यासाठी कोविड चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक नाहीये.

२) कोविड रुग्णाला कोणत्याही कारणास्तव उपचार नाकारला जाऊ शकत नाही. एका शहरातला रुग्ण दुसऱ्या शहरात उपचार घेऊ शकतो. शहर वेगळे असल्याच्या कारणावरून सेवा नाकारली जाऊ शकत नाही.

३) कोणताही रुग्ण त्याचे अधिकृत ओळखपत्र दाखवू शकला नाही तरी त्याला उपचार नाकारला जाऊ शकत नाही.

Exit mobile version