थॉमस कप विजेत्या संघाला भारत सरकारने घोषित केला विशेष पुरस्कार

थॉमस कप विजेत्या संघाला भारत सरकारने घोषित केला विशेष पुरस्कार

भारताच्या बॅडमिंटन संघाने जगविख्यात अशा थॉमस कप वर आपले नाव करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय संघाच्या या धमाकेदार कामगिरीसाठी जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून भारत सरकारने या बॅडमिंटनपटूंसाठी विशेष असा पुरस्कार जाहीर केला आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. चौदा वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियन संघाला धूळ चारत विजयश्री खेचून आणणाऱ्या भारतीय संघाला एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पूर्णतः रोख स्वरूपाचा असणार आहे.

हे ही वाचा:

माणिक सहांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा विसर

थॉमस कप जिंकत भारताने रचला इतिहास

अष्टपैलू माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

थॉमस कप ही जगातील काही नामांकित क्रीडा स्पर्धांपैकी एक मानली जातो. गेल्या ७३ वर्षात भारत एकदाही ही स्पर्धा जिंकला नव्हता. तर या आधी कधी उपांत्य फेरीतही भारतीय संघ दाखल झाला नव्हता. त्यामुळे यंदाचे भारताचे हे विजेतेपद ऐतिहासिक आहे. या संपूर्ण प्रवासात भारतीय संघाने काही जगविख्यात बॅडमिंटन संघांना पराभूत केले आहे. ज्यामध्ये मलेशिया डेनमार्क आणि अंतिम सामन्यात पोहोचलेल्या इंडोनेशियन संघाचा समावेश आहे.

भारताच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी देशभरातून भारतीय बॅडमिंटनपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. भारताच्या या विजयाने इतर होतकरू खेळाडूंना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे.

Exit mobile version