आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी

भारत फायनलमध्ये न पोहोचताच बाहेर पडला तरीही या संघातील १२ खेळांडूमध्ये तीन भारतीय खेळांडूचा समावेश आहे.

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी

आस्ट्रेलियात पार पडलेल्या टी २० विश्वचषकात यंदा भारत नक्कीच बाजी मारेल, अशी प्रत्येक क्रिकेटप्रेमींना आशा होती. साऊथ आफ्रिकेविरुद्धचा एक पराभव वगळता प्रत्येक सामना टीम इंडियाने प्रत्येक सामन्यात विजय नोंदवला होता. परंतु सेमीफायनमध्ये भारताचं नशीब पलटलं. इंग्लंडने भारतावर १० विकेट्सने विजय मिळवत भारताचा धुव्वा उडवला. भारताचं विश्वचषक जिंकण्याचा स्वप्नांचा चुराडा झाला. अंतिम सामन्यात नशीबाच्या जोरावर पोहोचलेल्या पाकिस्तानवर इंग्लंडने विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. इंग्लंडने २०१९ साली विजेतेपद मिळवले होते.

अंतिम सामना पार पडल्यानंतर आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२२ च्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे या यादीत आहेत. भारत फायनलमध्ये न पोहोचताच बाहेर पडला तरीही या संघातील १२ खेळांडूमध्ये तीन भारतीय खेळांडूचा समावेश आहे. यात वर्ल्डकप विजेते इंग्लंड यांचे ४ खेळाडू, पाकिस्तानचे २ आणि न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एक  खेळाडूंना या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीत भारताच्या दोन धडाकेबाज खेळाडूंची नावं या यादीत आहेत. ते खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली. गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीसीकडून प्लेअर ऑफ द मंथ म्हणून विराटच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

आयसीसीने जाहीर केलेल्या या संघाचे कर्णधारपद बटलरकडे सोपवण्यात आले आहे. सलामीवीर म्हणून एलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांना स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देण्यात यांचा मोलाचा वाटा होता. तिसऱ्या क्रमांकावर भारताच्या किंग कोहलीची वर्णी लागली आहे. या स्पर्धेत ४ अर्धशतकासह सर्वाधिक धावांचा रतीब त्याने घातला होता. चौथ्या क्रमांकावर भारताचा ३६० फलंदाज सूर्यकुमार यादव. ज्याने संपूर्ण मैदानाचे दर्शन प्रतिस्पर्धी गोलंदाजांना दाखवून सर्वांची वाहवा मिळवली होती.

हे ही वाचा:

आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे!

आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह दोघांना अटक

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

‘वास्तव’ फेम अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

 

पाचव्या स्थानी न्यूझिलंडचा ग्लेन फिल्पिस तर झिमाब्वेचा सिकंदर रजाला सहावे स्थान मिळाले आहे. रजाच्या स्फोटक कामगिरीमुळे झिम्बाब्वेने पाकिस्तानला धूळ चारली होती. सातव्या स्थानावर पाकचा शादाब खान तर आठव्या क्रमांकावर इंग्लंडचा सॅम करन आहे. नवव्या स्थानवर दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नोर्जे आहे. १० व्या क्रमांकावर इंग्लंडचा मार्क वुड तर अकराव्या स्थानावर शाहीन शाह आफरीदीचा समावेश आहे. १२ वा खेळाडू म्हणून भारताचा हार्दिक पंड्याचा या संघात स्थान देण्यात आले आहे.

टीम ऑफ द टूर्नामेंट
जोस बटलर – इंग्लंड (कर्णधार, विकेटकीपर)
एलेक्स हेल्स – इंग्लंड
विराट कोहली – भारत
सूर्यकुमार यादव – भारत
ग्लेन फिलिप्स – न्यूझीलंड
सिकंदर रजा – झिम्बाब्वे
शादाब खान – पाकिस्तान
सॅम करन – इंग्लंडन
एनरिक नोर्जे – द.आफ्रिका
मार्क वुड – इंग्लंड
शाहीन अफरीदी – पाकिस्तान
हार्दिक पंड्या – भारत (१२वा खेळाडू)

Exit mobile version