भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव सोमवारी कोथरूड परिसरातून अचानक बेपत्ता झाले पज त्यानंतर काही तासातच ते सापडले. आहेत. महादेव जाधव बेपत्ता झाल्यावर कुटुंबीयांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सहाराच्या विविध भागात शोध मोहीम राबवली. अखेर सोमवारी रात्री केदार जाधव यांचे वडील मुंढवा भागात पोलिसांना सापडले.
पुण्यातील कोथरूड भागात जाधव कुटुंब वास्तव्याला आहेत. केदार जाधव याचे वडील महादेव जाधव कोथरूड भागातून सोमवार, २७ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले. पण संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. अखेर घरच्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. केदारच्या ७५ वर्षीय वडिलांना स्मृतिभ्रंश आहे.
पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबविली. कोथरुड, एरंडवणे भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.परिसरातील रिक्षा थांबे आणि रिक्षाचालकांकडून माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करुन जाधव यांचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केदारच्या वडिलांचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले अखेर रात्री साडेआठच्या सुमारास केदारचे वडील मुंढवा भागात सापडले, असे अलंकार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांची भेट कुटुंबियांशी घालून देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
शरद पवार म्हणतात, सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही!
बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना
पंतप्रधान मोदींचे चित्र फाडणाऱ्या गुजरातच्या आमदाराची लायकी न्यायालयाने दाखविली
केदार जाधव हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने २०१४-२० मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व केले होते. केदारने ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह ४२.०९ च्या सरासरीने १,३८९ धावा केल्या. त्याने २७ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने नऊ टी-२० सामनेही खेळले आणि सहा डावात एका अर्धशतकासह १२२ धावा केल्या आहेत.