27 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषविश्वचषक २०२३ साठी धवन, तिलकला डच्चू; सूर्यकुमार, श्रेयसला संधी

विश्वचषक २०२३ साठी धवन, तिलकला डच्चू; सूर्यकुमार, श्रेयसला संधी

१५ सदस्यीय संघाची घोषणा

Google News Follow

Related

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा हा संघाचा कर्णधार असणार आहे तर हार्दिक पांड्या हा उपकर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. श्रीलंकेतील कँडी येथील भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. भारत आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान संघाचे कर्णधार पद रोहित शर्माकडे असणार आहे तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधार पद देण्यात आले आहे. रोहित शर्मासह शुभमन गिल हा सलामीसाठी उतरण्याची शक्यता असून विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल(विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

चहल, अश्विनला वगळले

फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले नाही. रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्याकडे फिरकीची जबाबदारी असणार आहे. तर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज यांच्याकडे जलद गोलंदाजीची जबाबदारी असेल.

धवन, तिलकला डच्चू

सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली असून शिखर धवन याला वगळण्यात आले आहे. दुसरीकडे इशान किशन आणि केएल राहुल विकिकेटकिपर म्हणून भूमिका बजावतील. त्यामुळे संजू सॅमसन याचा पत्ता कट करण्यात आला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. केएल राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केलेय. त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आशिया कप स्पर्धेत तिलक वर्मा याची वर्णी लागली होती मात्र, विश्वकप स्पर्धेत त्याला संधी मिळालेली नाही.

विश्वचषक २०२३ स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ इतर नऊ संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

हे ही वाचा:

आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले

प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

ट्रेनी एअर होस्टेसची हत्या केल्यानंतर आरोपीने कपडे बदलले! सीसीटीव्हीत झाले उघड

‘उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबद्दल केलेले वक्तव्य सुनियोजित’

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा