आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान हांगझोऊ येथे होणाऱ्या १९व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय महिला आणि पुरुष संघांची घोषणा केली आहे. पुरुषांचे टी २० क्रिकेट सामने २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान होतील. ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर, जितेश शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यष्टीरक्षक असतील.

आशियाई स्पर्धेसाठी महिला क्रिकेट संघाचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. महिलांचे सामने १९ ते २८ सप्टेंबरदरम्यान होतील. वेगवान गोलंदाज टिटास साधू हिची निवड स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. साधू हिने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हरमनप्रीत कौर संघाची कर्णधार तर, स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. एशियाडमध्ये आतापर्यंत केवळ तीनदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारताने सन २०१४मध्ये इंचियोन आशियाई स्पर्धेत भाग घेतला नव्हता. क्रिकेट विश्वचषक स्पर्धाही ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने बीसीसीआयने आशियाडसाठी दुय्यम दर्जाचा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुरुष संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, अवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेशकुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक)

राखीव खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन

हे ही वाचा:

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी करणारा ‘वॅगनर’च्या म्होरक्याचा मृत्यू?

महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, टिटास साधू, राजेश्वरी गायकवाड, मीनू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनुषा बेरेडी

राखीव खेळाडू : हरलीन देयोल, काशवी गौतम, स्नेह राणा, सैका इशाक, पूजा वस्त्राकर

Exit mobile version