भारतीय स्वदेशी लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या ६१७ प्रकारावर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाऊची यांनी दिली आहे. भारतीय कोवॅक्सिनला जगमान्यता मिळत असल्याचं दिसून येतंय त्यामुळे भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे.
भारतीय कोवॅक्सिन लस ही जगातील कोरोनाच्या ६१७ प्रकाराच्या व्हेरिएंटना किंवा म्युटंटना पुरून उरतेय. व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फाऊची यांनी सांगितलं की, आम्ही कोरोनासंबंधी रोज डेटा गोळा करतोय. जे लोक भारतीय कोवॅक्सिन लस घेत आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर ती लस कोरोनाच्या ६१७ प्रकार अर्थात व्हेरिएन्टवर गुणकारी आहे असं समोर आलं आहे. ही लस घेतल्यानंतर संबंधिताच्या शरीरात कोरोना विषाणूच्या विरोधात अँटीबॉडीज् तयार होत आहेत.
स्वदेशी लस कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादची कंपनी भारत बायोटेक ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या मदतीने करत आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापराला ३ जानेवारीला मंजुरी मिळाली होती.
स्वदेशी लस म्हणून ओळखली जाणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा फेज ३ चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. यात ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर ७८ टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल आयसीएमआरनं दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोव्हॅक्सिन लस सध्या घातक असलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. कोवॅक्सिनची एकूण कार्यक्षमता ७८ टक्के तर गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन १०० टक्के कार्यक्षम असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा:
चाचण्या वाढवा, आकडा लपवू नका- देवेंद्र फडणवीस
थ्री डी प्रिंटिंगमधून उभी राहणार बिल्डिंग
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी सीबीआयकडे केले अनेक गौप्यस्फोट?
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
भारतात डबल म्युटंट या कोरोनाच्या प्रजातीमुळे हाहाकार माजला असून कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. त्यातच बंगालसारख्या काही ठिकाणी ट्रिपल म्युटंटचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी स्वदेशी लस कोवॅक्सिन ही ६१७ प्रकारच्या कोरोना प्रजातींवर गुणकारी असल्याचा अमेरिकेचा अभ्यास काहीसा दिलासादायक आहे