28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष...आणि समुद्रात कलंडलेल्या मंगलम जहाजातील सर्वांचे वाचवले प्राण

…आणि समुद्रात कलंडलेल्या मंगलम जहाजातील सर्वांचे वाचवले प्राण

Google News Follow

Related

खराब हवामानामुळे रायगड येथील रेवदंडा समुद्रात एक जहाज भर पहाटे एका बाजूला कलंडल्यामुळे अनेक जहाजावरील प्रवासी अडकून पडले. घटना घडताक्षणी भारतीय तटरक्षक दलाचं बचाव कार्य सुरु झाले. त्यानंतर या जहाजातून १६ जणांना भारतीय तटरक्षक दलांने हेलिकाँप्टरच्या साह्याने वाचवलं. अतिशय चित्तथरारक असा हा प्रसंग होता. यातून १६ जणांना वाचविण्यात यश आलेले आहे.

रेवदंडा खाडीमध्ये मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीकरिता येणारे मंगलम नावाचे कार्गो जहाज एका बाजूला कलंडले होते. या जहाजावर १६ खलाशी होते व त्यांची सुटका करण्यासाठी मुरुड वरून भारतीय तटरक्षक दलाचा चमू दाखल झाला. भारतीय तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्याला सुरुवात केली. या बचावकार्यामध्ये १६ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली.

हे ही वाचा:
शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती निवडणुकीपूर्वीचीच

शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या स्वरा भास्कर विरोधात तक्रार दाखल

खराब हवामानामुळे हे जहाज कलंडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी जहाज बुडणार ही माहिती जहाजावरील कर्मचारी वर्गाला देण्यात आली. जहाज अर्धवट बुडत असतानाच खलाशी जहाज सोडून जाण्यासाठी तत्पर होते. एकूणच जहाजावरील सर्वच चमू हा घाबरलेल्या अवस्थेत होता. परंतु भारतीय तटरक्षक दलाने मात्र ऐनवेळी जहाजावरील सर्व सदस्यांना धीर दिला.

भारतीय तटरक्षक दलाचे जहाज सुभद्रा कुमारी चौहान दिघी बंदरातून निघाले आणि मदत कार्यासाठी पुढे सरसावले. दरम्यान, एमव्ही मंगलममधून सदस्यांना हलवण्यासाठी आयसीजी एअर स्टेशन दमण येथून दोन आयसीजी हेलिकॉप्टरही सुरू करण्यात आले. आय.सी.जी.एस. सुभद्रा कुमारी चौहान जवळपास सव्वा १६ च्या सुमारास दुर्घटना झाली त्याठिकाणी पोहोचले. एकंदर परिस्थिती आव्हानात्मक होती, त्याही परिस्थितीमध्ये बचावासाठी बोटींचा वापर करायचे ठरले. शिवाय, सीजी हेलिकॉप्टर्सही त्या ठिकाणी पोचले आणि खराब हवामान असतानाही कर्मचारी वर्गाला हवाईमार्गाने बाहेर काढण्याची सुरुवात केली. सुटका झालेल्या सर्व १६ जणांना रेवदंडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलेले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा