पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी शुभमन गिल ९९ टक्के खेळणार

रोहित शर्माचे मत; भारत-पाकिस्तान आज झुंज

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी शुभमन गिल ९९ टक्के खेळणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमधील बहुचर्चित सामना शनिवारी खेळविला जाणार असून या सामन्यात भारताचा शुभमन गिल ९९ टक्के खेळण्याची शक्यता कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली आहे.

शुभमन गिल हा या सामन्याच्या निमित्ताने वर्ल्डकपमधील पदार्पण साजरे करणार आहे. त्यामुळे त्याच्या उपस्थितीबद्दल उत्सुकता आहे. सध्या तो डेंग्युच्या आजारातून बरा होत आहे. त्याला काही दिवसांपूर्वी डेंग्यु झाल्याचे निदान झाले होते. तेव्हा तो वर्ल्डकपमधील काही सामन्यांना मुकणार का, असा सवाल विचारला जात होता. त्यातून पहिल्या दोन सामन्यांत त्याला खेळता आले नाही. त्यात भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केले. इशान किशनने त्याची जागा घेतली होती. मात्र आता गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघासोबत तो सरावसत्रातही सहभागी होणार आहे. त्यानंतर संघव्यवस्थापन गिलच्या समावेशाविषयी निर्णय घेईल. पण रोहित शर्माने त्याला खेळण्याची ९९ टक्के संधी असल्याचे म्हटले आहे.

 

जर शुभमन गिल भारतीय संघात परतला तर भारतीय संघाची ताकद वाढणार आहे. जानेवारी महिन्यात शुभमनला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. आयसीसीच्या या पुरस्काराच्या शर्यतीत त्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मालन यांना मागे टाकले होते.

हे ही वाचा:

ऑपरेशन अजयमुळे इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले

पुढच्या निवडणुकांआधीच निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!

नीरज चोप्राला ‘वर्ल्ड ऍथलिट ऑफ दी इअर’ पुरस्कारासाठी नामांकन

भारतात शुभमनची कामगिरी आतापर्यंत उत्तम झालेली आहे. त्याने १४ डावांत ८८२ धावा केलेल्या आहेत. शुभमनच्या या अवस्थेनंतर युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली होती की, मी वर्ल्डकप खेळत असताना मला कर्करोगाचे निदान झाले होते. तरीही मी खेळण्यासाठी मैदानात उतरलो होतो. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी शुभमनदेखील सज्ज होईल, अशी खात्री आहे. डेंग्यु झालेला असतानाही खेळायला उतरणे हे कठीण आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे तो फिट असेल तर तो नक्कीच खेळेल.

Exit mobile version