भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजकडे डीएसपी पदाची जबाबदारी

तेलंगणा सरकारने दिली जबाबदारी

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजकडे डीएसपी पदाची जबाबदारी

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्याकडे आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. तेलंगणात पोलीस उपअधीक्षक पदाची जबाबदारी मोहम्मद सिराज याला देण्यात आली आहे. सिराज याने शनिवारी अधिकृतपणे डीएसपी पदाचा पदभार स्वीकारला आहे. सिराजने तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जितेंद्र आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जुलैमध्ये सिराजला निवासी भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सिराजने मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेवंत रेड्डी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सिराजचे अभिनंदन केले होते.

सिराजकडे श्रेणी- १ च्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता नव्हती. पण राज्य मंत्रिमंडळाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अटींमध्ये शिथिलता दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याला सूट दिली. श्रेणी- १ च्या नोकरीसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. सिराज इंटरमिजिएट (१२ वी) उत्तीर्ण आहे. पण त्याला श्रेणी- १ ची नोकरी देण्यासाठी शैक्षणिक पात्रतेत सूट दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली होती.

हे ही वाचा:

भारत सामर्थ्यशाली होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

मोहम्मद सिराज हा उत्कृष्ट गोलंदाज असून त्याने त्याच्या चमकदार कामगिरीमुळे अनेकदा भारताला विजय मिळवून दिला आहे. सिराज याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये २७.५७ च्या सरासरीने १६३ विकेट घेतल्या आहेत. त्याने ४ नोव्हेंबर २०१७ रोजी राजकोट येथील न्यूझीलंड विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामान्यात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २९ कसोटी, ४४ एकदिवसीय आणि १६ टी- २० सामने खेळले आहेत. टी- २० विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो एक भाग होता. याआधी तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही खेळला आहे.

Exit mobile version