लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर

लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने आपली पकड बनवली आहे. पहिल्या दिवसा अखेर भारताने धाव फलकावर २७६ धावा चढवल्या असून भारताचे केवळ ३ गडी बाद झाले आहेत. भारताचा धडाकेबाज सलामीवीर लोकेश राहुल हा शतकी खेळी करून नाबाद राहिला आहे.

गुरुवार, १२ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पण सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत सामन्यावर पकड बनवायला सुरुवात केली. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी उच्च दर्जाचा संयमी खेळ दाखवला. त्या दोघांनी १२६ धावांची भागीदारी रचली. ज्यामध्ये सुरुवातीला रोहित शर्मा याने ८३ धावांची अप्रतिम खेळी केली.

हे ही वाचा:

शिक्षणसम्राट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुडघे

संजय राठोड करतो लैंगिक छळ…यवतमाळ पोलिसांना पीडित महिलेचे पत्र

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक

फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश

शर्मा बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने शतक ठोकले असून सध्या तो नाबाद १२७ धावांवर खेळत आहे. राहुलला कर्णधार विराट कोहली याने चांगली साथ देत ४२ धावांची खेळी केली. सध्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा राहुलला साथ देत आहे. पण भारताचा महत्त्वाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा मात्र याही सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.

इंग्लंड संघाकडून त्यांच्या गोलंदाजीतील हुकमी एक्का जेम्स अँडरसन हा पुन्हा एकदा संघासाठी धावून आला. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा असे दोन महत्त्वपूर्ण बळी त्याने आपल्या संघासाठी घेतले. तर विराट कोहलीला माघारी धाडण्यात रोबिन्सनला यश आले. पण या संपूर्ण पहिल्या दिवसाचा लेखाजोखा मांडायचा झाला तर भारतीय संघ हा सुस्थितीत आहे.

Exit mobile version