आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चार सामने खेळले गेले असून, या सामन्यांमध्ये धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत अव्वल १० फलंदाजांमध्ये ५ भारतीय आणि ५ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
विराट कोहलीने दमदार सुरुवात केली
“रन मशीन” विराट कोहली याने या हंगामाची सुरुवात ५९ धावांच्या खेळीने केली आणि तो सध्या नवव्या स्थानावर आहे. 2024 मध्ये विराट कोहली १५ सामन्यांत ७४१ धावा करून ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्याने ११३ धावांची सर्वोत्तम खेळी, १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती. यंदाच्या हंगामातही त्याने दमदार सुरुवात केली असून, तो लवकरच यादीत वरच्या स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२५ : ऑरेंज कॅप टॉप-१० फलंदाजांची यादी
क्रमांक | खेळाडू | संघ | धावा | सर्वोत्तम खेळी |
---|---|---|---|---|
१ | ईशान किशन | सनरायझर्स हैदराबाद | १०६ | १०६* |
२ | निकोलस पूरन | लखनौ सुपर जायंट्स | ७५ | ७५ |
३ | मिचेल मार्श | लखनौ सुपर जायंट्स | ७२ | ७२ |
४ | ध्रुव जुरेल | राजस्थान रॉयल्स | ७० | ७० |
५ | ट्रॅव्हिस हेड | सनरायझर्स हैदराबाद | ६७ | ६७ |
६ | आशुतोष शर्मा | दिल्ली कॅपिटल्स | ६६ | ६६ |
७ | संजू सॅमसन | राजस्थान रॉयल्स | ६६ | ६६ |
८ | रचिन रवींद्र | चेन्नई सुपर किंग्स | ६५ | ६५ |
९ | विराट कोहली | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | ५९ | ५९ |
१० | फिल सॉल्ट | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | ५६ | ५६ |
ईशान किशनने पहिला क्रमांक पटकावला
सनरायझर्स हैदराबादच्या ईशान किशनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १०६धावांची तडाखेबाज खेळी केली आणि सध्या तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आहे.
लखनौच्या पूरन आणि मार्शनेही दमदार खेळी केली
लखनौ सुपर जायंट्सचा तडाखेबाज फलंदाज निकोलस पूरन (७५ धावा) आणि मिचेल मार्श (७२ धावा) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा :
काय आहे माओवाद, फुटीरतावाद विरोधी जनसुरक्षा विधेयक? सभेतून देणार समर्थन
‘शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ विषयावर व्याख्यान
तेलंगणामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे कोरटकर लपून होता!
राममंदिर निर्माण : डिसेंबरपर्यंत ऑडिटोरियम वगळता सर्व कामे पूर्ण होतील
भारतीय फलंदाजांची चमकदार कामगिरी
ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. ईशान किशन, विराट कोहली, ध्रुव जुरेल, संजू सॅमसन आणि आशुतोष शर्मा यांनी टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.
आयपीएल २०२५ अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि पुढील सामन्यांमध्ये ही यादी बदलू शकते. आता पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, यंदा भारतीय खेळाडू ऑरेंज कॅप जिंकतात का, की विदेशी फलंदाज बाजी मारतात!