अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळून एका पायलटचा मृत्यू

अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली आहे.

अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळून एका पायलटचा मृत्यू

अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून यात एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ही दुर्घटना बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैमानिकांपैकी एक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत.

आर्मी चिता हेलिकॉप्टर आपली नियमित कर्तव्य बजावत असताना तवांगजवळ सकाळी १० वाजता हेलिकॉप्टर कोसळले. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही वैमानिकांना ३०५ फील्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या वैमानिकांपैकी एक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा 

सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू

दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी

२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले

दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी

लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या अपघातासाठी स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे.

Exit mobile version