चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

आसाममधील तेजपूर विद्यापीठात गिरवणार चिनी भाषेचे धडे

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

पूर्वेकडील चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने मोठे पाऊल उचलले आहे. चिनी सैनिकांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान आता चीनी मँडरीन भाषा शिकणार आहेत. या जवानांसाठी आसाममधील तेजपूर विद्यापीठामध्ये चीन भाषेतील एक खास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.चीनलगतच्या सीमेवर संरक्षण करताना भाषेची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

भारतीय लष्कराने आपल्या सैनिकांना चिनी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी तेजपूर विद्यापीठाशी करार केला आहे. भारतीय लष्कर आणि तेजपूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असल्याचे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाचा कालावधी १६ आठवडे म्हणजेच चार महिन्यांचा असेल. भारतीय लष्कराच्या वतीने ४ कॉर्प्स, गजराज कॉर्प्स आणि तेजपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी स्वाक्षरी केली आहे. सामंजस्य करारानुसार तेजपूर विद्यापीठाचे प्राध्यापक चिनी भाषेचे प्रशिक्षण देणार आहेत.

१९९४ मध्ये स्थापन झालेले तेजपूर विद्यापीठ चिनी भाषेसह परदेशी भाषा शिकवण्यात अग्रणी आहे. या विद्यापीठात चिनी भाषा शिकवणारे तज्ञ प्राध्यापक आहेत . भारतीय लष्कराचे जवान या विद्यापीठामध्ये प्रामुख्याने मँडरिन भाषा शिकणार आहेत . या भागामध्ये ही भाषा सर्वाधिक बोलली जाते. त्यामुळे ही भाषा शिकल्यानंतर भारतीय जवानांना संवाद साधने खूप सुकर होणार आहे. त्याच बरोबर चिनी भाषा कौशल्य भारतीय सैनिकांना चिनी सैनिकांसमोर आपले मुद्दे अधिक ताकदीने मांडण्यास मदत करेल. तसेच, कमांडर स्तरावरील चर्चा, ध्वज बैठक, संयुक्त सराव आणि सीमेवरील जवानांच्या बैठकीदरम्यान चिनीचा हालचाली समजून घेणे सोपे होईल.

हे ही वाचा:

भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले

अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

लडाखमध्ये भारतीय सैनिक आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील हिंसक चकमकीच्या झालेल्या घटनांतरइंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलानेही (आयटीबीपी) आपल्या सैनिकांसाठी प्रगत मँडरिन अभ्यासक्रम तयार होता. आयटीबीपीच्या जवानांना मँडरिन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी मसुरीमध्ये एका केंद्राची स्थापना करण्यात आली. यामधून आतापर्यंत १५० जवानांनी मँडरिन भाषा आत्मसात केली आहे.आता आयटीबीपीमधील सर्व अधिकारी आणि जवानांना मँडरिन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. आयटीपीबीमध्ये ९० हजार जवान असून त्यांच्याकडे साडे तीन हजार किलोमीटरच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.

Exit mobile version