24 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषचिन्यांना प्रत्युत्तर; भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात फडकावला तिरंगा

चिन्यांना प्रत्युत्तर; भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात फडकावला तिरंगा

Google News Follow

Related

चीनच्या माध्यमांकडून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गलवान खोऱ्यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. चीनच्या या कृतीनंतर आता भारतीय सैन्यानेही चीनला उत्तर देत गलवान खोऱ्यात भारताचा ध्वज फडकवला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून ध्वज फडकवण्यात आल्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या माहितीनुसार चीनकडून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ हा त्यांच्याच भूमितला असून त्या जागेसंदर्भात कोणताही वाद नसल्याचे समोर आले आहे.

चीनच्या कुरापती अजूनही सुरूच असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशमधील १५ ठिकाणे चीनच्या नकाशावर दाखविली होती. चीनने नव्या वर्षाच्या सुरूवातीलच व्हायरल केलेल्या व्हिडिओत त्यांच्या सैन्याने गलवान खोऱ्यात चीनचा राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगीत म्हटले असल्याचा दावा करण्यात आला होता. पत्रकार शॅन शिवेई यांनी ट्वीट करून याबाबत सांगितले होते.

हे ही वाचा:

गलवानवरून टीका करणारे तोंडावर आपटले; चिनी ध्वज त्यांच्याच भूमीतला

जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे   

त्यानंतर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर देत आपला तिरंगा फडकवला आहे. भारतीय सैन्याने या भागात तिरंगा फडकवला. डोग्रा रेजिमेंट ही या भागात तैन्यात असून त्यांचा ध्वजही फडकवण्यात आला. चीनकडून व्हायरल झालेला व्हिडीओ हा दुसऱ्या ठिकाणचा असल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या व्हिडीओवरून अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. चीनने भारतात त्यांचा राष्ट्रध्वज फडकाविल्याचा बभ्रा करण्यात आला. मात्र, आता हे टीका करणारेच तोंडावर आपटले असल्याचे चित्र आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा